महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आज भाजप, उद्या काँग्रेस उमेदवार भरणार अर्ज

12:26 PM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरजी गुरुवारी दाखल करणार उमेदवारी

Advertisement

पणजी : भाजपचे दोन्ही उमेदवार आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार रामनवमी म्हणजे बुधवार दि. 17 रोजी अर्ज भरणार असून आरजीचे उमेदवार गुऊवार दि. 18 रोजी अर्ज दाखल करतील. आज मंगळवारी सकाळी 11.15 वा. दक्षिण गोवा मतदारसंघातील लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे या मडगाव येथे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमोर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उत्तर गोव्यातील लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक हे दुपारी 12.30 वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमोर उमेदवारी अर्ज सादर करतील. दोन्ही उमेदवारांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच अन्य भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी सकाळी 10 वाजता मडगाव भाजप कार्यालयाजवळ यावे तसेच श्रीपाद नाईक यांच्या सोबत येणाऱ्यांनी पणजीतील भाजप कार्यालयाजवळ 11 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन नरेंद्र सावईकर यांनी केले आहे. गोवा सरकारने उद्या 17 एप्रिल रोजी रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असली तरी लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरुच राहणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article