महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निश्चलपणे चालणे एथिचे...

06:35 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अलीकडेच ज्ञानदेवांचा समाधी सोहळा संपला आणि मनाला एक विषण्णावस्था जाणवली. सतत पायी तीर्थयात्रा करणारी ही भावंडं समाधी अवस्थेला प्राप्त झाली म्हणजे सगळं थांबलं का? याचं उत्तर म्हणजे या ओळी...

Advertisement

माणसाची सगुण शरीराची यात्रा जरी थांबली तरी आत्म्याचा प्रवास अव्याहत सुरूच असतो, याचा संकेत देणारी ही समाधीची अवस्था होय. माणूस पायाने चालणे थांबवत असला तरी मनाने तो साऱ्या ब्रम्हांडात फिरत असतो आणि ही चंचलता थांबवणं म्हणजेच निश्चलपणे चालणं असं माऊली आम्हाला सांगते. हे सगळं करण्यासाठी आम्हाला योगाभ्यासाने मनाची चाल नियंत्रित करावी लागते. अशी निस्तब्धता योगाने येते. योगशास्त्रामध्ये प्रत्येक अवयवांमधली शक्ती काढून बाजूला ठेवण्याची ताकद आहे. आमचे हात, आमचे पाय, आमचे डोळे, आमचं मन स्थिर करण्याची क्षमता या योगाभ्यासाने साध्य करता येते आणि म्हणूनच योगाभ्यास साधणारी मंडळी शांतपणे डोळे उघडे ठेवून निद्रा घेऊ शकतात किंवा तिथे असूनसुद्धा अलिप्त राहू शकतात. माऊलींनी याच अवस्थेत आपल्या स्वरूपाला बघण्याचीसुद्धा किमया साधली होती. स्वरूप बघायचं म्हणजे नेमकं काय. विहिरीतलं पाणी आपल्याला दिसतं परंतु हे पाणी नेमकं कुठून झिरपतं तो झरा म्हणजेच आपलं स्वरूप हे ज्याला समजतं किंवा जाणवतं ती खरी समाधी अवस्था. समर्थ रामदासांनी देखील एका वाक्यात याचा सार आम्हाला सांगितला, विवेकी सदा सस्वरूपी भरावे. चांगल्या विवेकाने मनाचे विकार किंवा विचार आम्हाला थांबवता आले पाहिजे. हे ज्याला जमतं त्याला ह्या जन्मात ही निश्चलता जिवंतपणे अनुभवता येते. म्हणजे झऱ्यासारखं प्रवाहितपण असणं आणि भरलेपण पण असणार. या दोन्ही अवस्था एकाचवेळी आम्हाला अनुभवता येतात याचं आणखीन एक उदाहरण देताना माऊली आम्हाला सांगते, आपण समुद्रात गेल्यानंतर बरेच जण सांगतात की आत्ता भरती आहे, ओहोटी आहे पण भरती केव्हा सुरू होते आणि संपते आणि ओहोटी केव्हा सुरू होते याची नेमकी जाणीव नसते. पण हेच क्षण निश्चलता जाणवून जातात, यालाच प्रगाढ शांतता म्हणतात. ज्ञानदेवांनी यालाच ‘ सम’ अवस्था किंवा स्वसंवेद्य अवस्था म्हंटलय....जी सांगता येत नाही पण अनुभवता येते. स्वरूप अवस्था जी भक्तीसाठी गरजेची असते.

Advertisement

हेच सम चरण पांडुरंगाला प्राप्त झाले असल्याने तो स्थिर असतो पण विश्व गतिमान करतो. अशी निश्चलता, क्षणभर उभं राहणं आम्हा प्रत्येकाला जमायला हवं.

कारण ‘चराति चरतो भग:’ चालणाऱ्याचे भाग्य चालते याची अनुभूती येतेच. चालताना नदी, नाले, पक्षी, फुले डोंगरदऱ्या, निसर्ग, सगळंच आपण अनुभवत असल्याने माणसाला संपन्न बनवते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article