महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी...

06:22 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेच्या लॉस एंजल्स या शहरातील ही घटना आहे. येथील एक नागरीक जॉन पेनिंग्टन यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला जखम झाल्याने ते बेशुद्ध होऊन कोमात गेले होते. त्यांच्या फुप्फुसांनाही मार लागला होता. त्यामुळे त्यांचे कार्य बिघडले होते. अत्यंत नाजूक अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर जवळपास 6 महिने उपचार करण्यात आले. सुदैवाने त्यांचा जीव वाचला. प्रदीर्घ बेशुद्धावस्थेतून ते शुद्धीत आले.

Advertisement

त्यानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्याची वेळ आली. डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या हातात उपचारांच्या खर्चाची पावती ठेवली. तब्बल 22 कोटी रुपयांचे बिल पाहून पेनिंग्टन यांना अक्षरश: घाम फुटला आणि त्यांची शुद्ध हरपली, असे बोलले जाते. नंतर त्यांना पुन्हा शुद्धीत आणण्यात आले. एवढे मोठे बिल देणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना मोठे कर्ज काढावे लागले. आपली ही कहाणी सोशल मिडियावर टाकून एका सार्वजनिक निधीसंस्थेची स्थापना केली. लोकांना या संस्थेला दान द्यावे आणि आपल्याला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करावे अशी विनंती त्यांनी केली. लोकांनीही त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना प्रतिसाद दिला. त्यामुळे स्वत:कडचे शिल्लक पैसे, कुटुंबियांनी केलेले अर्थसाहाय्य आणि हा सार्वजनिक निधी यांच्यातून त्यांनी स्वत:ला कर्जमुक्त केले. लोकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या विनंतीला दिलेल्या प्रतिसादामुळे आज आपण सन्मानाचे जीवन जगत आहोत, असे त्यांनी सोशल मिडियावर आवर्जून स्पष्ट केलेले आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article