महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय महामार्गांलगत पर्यटन हॉटस्पॉट विकसित करणार

12:17 PM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यटनवृद्धीसाठी साबांखाचा प्रस्ताव : आंतरराष्ट्रीय सल्लागार करणार अभ्यास

Advertisement

पणजी : राष्ट्रीय महामार्गांजवळ उपलब्ध मोकळ्या जागा पर्यटन हॉटस्पॉट म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून राज्यात पर्यटनवृद्धी तसेच आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने लवकरच महामार्गांलगत मोकळ्या जागांचा शोध घेण्यासाठी गरज भासल्यास आंतरराष्ट्रीय सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. महामार्गांलगत अशा मोकळ्या जागा उपलब्ध झाल्यास तेथे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स विकसित केली जाऊ शकतात. त्यामुळे रोजगार निर्माण होतील तसेच राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासही मदत मिळणार आहे. ज्या प्रमाणे देशाची व्यावसायिक राजधानी म्हणून मुंबई विकसित झाली, त्याच धर्तीवर गोवा राज्य भारताची पर्यटन राजधानी बनविणे शक्य होणार आहे. नुकत्याच पूर्ण क्षमतेने खुल्या करण्यात आलेल्या झुआरी पुलावर ट्विन टॉवर्स बांधण्यात आल्यानंतर राज्यासाठी ते प्रमुख पर्यटन आकर्षण ठरणार असून अन्य देश आणि राज्यात जाणाऱ्या पर्यटकांना खेचून आणण्यात मदतगार ठरणार आहेत. त्यांच्या जोडीला महामार्गांलगत अतिरिक्त पर्यटन स्थळे विकसित करण्यात आल्यास गोव्याकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. त्याशिवाय भविष्यात अशा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी देशविदेशातील दिग्गज कलाकारांचे लाईट आणि साउंड शो सादर करण्याचीही योजना या प्रकल्पात आहे, अशी माहिती साबांखातील एका वरिष्ठ अभियंता अधिकाऱ्याने दिली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article