For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुहास यथिराज, प्रमोद भगत, कृष्णा नागरला जेतेपदे

06:52 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुहास यथिराज  प्रमोद भगत  कृष्णा नागरला जेतेपदे
Advertisement

वृत्तसंस्था/ पटाया, थायलंड

Advertisement

भारताच्या सुहास यथिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी रविवारी येथे झालेल्या पॅरा बॅडमिंटन जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुऊष एकेरीच्या एसएल-4, एसएल-3 आणि एसएच-6 वर्गांत सुवर्णपदके मिळवून आपली प्रभावी छाप उमटविली.

पॅराऑलिमिक रौप्यपदक विजेता आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या यथिराजने एसएल-4 वर्गातील अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानला 21-18, 21-18 असे पराभूत करून पहिले जागतिक विजेतेपद पटकावले. ‘सुवर्ण मिळाले आहे, जगज्जेता बनल्याचा आनंद आणि अभिमान आहे’, असे 40 वर्षीय यथिराजने ट्विट केले. तो मूळ कर्नाटकचा असून उत्तर प्रदेश केडरचा 2007 च्या तुकडीचा आयएएस अधिकारी आहे.

Advertisement

टोकियो पॅराऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता भगत, ज्याने चीनमधील पॅरा आशियाई क्रीडास्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली होती, त्याने एसएल-3 वर्गाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डॅनियल बेथेलचा 14-21, 21-15, 21-14 असा पराभव केला. अशा प्रकारे भगतने किताबांची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. त्याने 2022 च्या टोकियो आणि 2009 च्या सोल येथील स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. मी माझा आदर्श लिन डॅनच्या पाच जागतिक विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यात आणि दुसरे म्हणजे सलग तीन विश्वविजेतेपदे मिळविण्यात यशस्वी झालो आहे’, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

सुवर्णाव्यतिरिक्त 35 वर्षीय भगतने सुकांत कदम आणि मनीषा रामदाससह अनुक्रमे पुऊष दुहेरीत आणि मिश्र दुहेरीमध्ये दोन कांस्यपदके जिंकली. या तीन पदकांनी त्याने जिंकलेल्या पदकांची संख्या 14 वर नेली आहे, ज्यामध्ये 6 सुवर्ण, 3 रौप्य व 5 कांस्यपदके आहेत. ‘एसएच-6’ वर्गात पॅराऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कृष्णा नागरने पुऊष एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या लिन नैलीवर 22-20, 22-20 असा विजय मिळवून जेतेपद पटकावले.

‘एसयू-5’ वर्गातील महिला एकेरीत मनीषा रामदासला अंतिम फेरीत चीनच्या यांग किउ झिया हिच्याकडून 16-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चिराग बरेथा-राज कुमार या पुऊष दुहेरीतील जोडीला आणि रचना शैलेशकुमार व नित्यश्री सुमथी सिवन या महिला दुहेरीतील जोडीला एसयू-5 आणि एसएच-6 वर्गातील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला दुहेरीतील (एसएल-3-एसयू-5) अन्य एका अंतिम सामन्यात मानसी जोशी आणि तुलसीमाथी मुऊगेसन यांना इंडोनेशियन जोडीकडून 20-22, 17-21 असा पराभव पत्करावा लागून रौप्यपदक प्राप्त झाले.

Advertisement
Tags :

.