कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टायटनने दमासमधील हिस्सेदारी केली खरेदी

06:49 AM Jul 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दागिन्यांच्या व्यवसायातील कंपनी : 67 टक्के हिस्सेदारी घेतली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

गल्फ समूहातील देशांमध्ये दागिन्यांच्या व्यवसायात कार्यरत असणारी कंपनी दमास एलएलसी यामधील 67 टक्के हिस्सेदारी टायटन या कंपनीने नुकतीच प्राप्त करण्यामध्ये यश मिळवले आहे. हा हिस्सेदारी खरेदीचा व्यवहार कंपनीने रोखीमध्ये केला असल्याचेही सांगितले जात आहे. मनाई कॉर्पोरेशन यांच्याअंतर्गत कार्यरत असणारी दमास एलएलसी ही दुबईमध्ये कार्यरत असून कंपनी दागिन्यांचा व्यवसाय करते. सदरचा खरेदीचा व्यवहार हा 2439 कोटी रुपयांमध्ये झाला असल्याचेही सांगितले जात आहे.

गल्फ समूह देशात लोकप्रियता

दमास ज्वेलरीचा व्यवसाय दुबईसह संयुक्त अरब अमिरात, सौदी अरब, कतार, ओमान, कुवेत आणि बहारेन यासारख्या ठिकाणी पाहायला मिळतो. कंपनीची गल्फ समूहांतर्गत देशांमध्ये पाहता एकूण 146 दागिन्यांची शोरूम्स कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 2029 पर्यंत टायटन ही कंपनी दमासमधील उर्वरित 33 टक्के इतक्या हिस्सेदारी खरेदीचा व्यवहारही पूर्ण करेल असे सांगितले जात आहे.

विस्ताराला मिळणार दिशा

टायटनचा तनिष्का अंतर्गत दागिन्यांचा व्यवसाय देशात तसेच विदेशातही कार्यरत असून येणाऱ्या काळामध्ये गल्फ समूहातील देशांमध्ये त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये दागिन्यांच्या व्यवसायाचा विस्तार केला जाणार असल्याचे म्हटले आहे. दमास ज्वेलरी यांची सुरुवात 1907 मध्ये दुबईमध्ये करण्यात आली होती. त्यांच्या एकंदर 146 शोरूम्स आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article