कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठळकवाडी संघाकडे हनुमान चषक, प्रज्योत उघाडे सामनावीर, मालिकावीर

09:58 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : एसकेई सोसायटी आयोजित हनुमान चषक 15 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ठळकवाडी संघाने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर केएलएसचा 27 धावांनी पराभव करून हनुमान चषक पटकाविला.  अष्टपैलू प्रज्योत उघाडेला सामनावीर व मालिकावीराने गौरविण्यात आले. प्लॅटिनम जुबली मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ठळकवाडीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडीबाद 67 धावा केल्या.त्यात प्रज्योत उघाडेने 33, नागेश्वर बेनकेने 10 धावा, केएलएसतर्फे सोहम पाटीलने 19 धावात 3 तर सुरेंद्र पाटील व सिध्दांत रायकर यांनी प्रत्येकी 2, ऋशिकेश बंगोडी, वेदांत दुदाने यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलएस संघाचा डाव 17.2 षटकात 40 धावात आटोपला. त्यात सोहम पाटीलने 12, सिध्दार्थ रायकरने 11, वेदांत दुदानीने 10 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे प्रज्योत उघाडेने 11 धावात 4, वेदांत पोटेने 7 धावात 2, श्रीहरी जाधव व ज्ञानेश्वर मोरे यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला.

Advertisement

Advertisement

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे एसकेई सोसायटीचे स्पोर्ट्स  विभागाचे चेअरमन आनंद सराफ, नित्यानंद करमळी, पुरस्कर्ते आनंद सोमनाचे, मनोज चवरे यांच्याहस्ते विजेत्या ठळकवाडी व उपविजेत्या केएलएस संघाना चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज सोहम पाटील केएलएस, उत्कृष्ट गोलंदाज सुरेंद्र पाटील केएलएस, इम्पॅक्मट खेळाडू ज्ञानेश्वर मोरे, उत्कृष्ट यष्टीरक्षक श्रीहरी बस्तवाडकर दोघेही ठळकवाडी, उत्कृष्ट संघ ज्ञानप्रबोधन मंदीर, सामनावीर व मालिकावीर प्रज्योत उघाडे यांना चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून प्रसाद नाकाडी, जोतिबा पवार, तेजस पवार, सोमनाथ सोमनाचे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद कोरागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विवेक पाटील, उमेश मजुकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article