महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठळकवाडी, केएलई ‘ब’ संघ विजयी

10:33 AM Dec 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दासाप्पा शानभाग क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित दासाप्पा शानभाग चषक 16 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात ठळकवाडी स्कूल व केएलई इंटरनॅशनल ब शालेय संघाने एकतर्फी विजय नोंदविले. पहिला सामना ठळकवाडी शालेय संघाने सेंट झेवियर्स स्कूलचा 78 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ठळकवाडी शालेय संघाने 25 षटकात 7 बाद 175 धावा केल्या. श्रेयस बस्तवाडकर 10 चौकारांसह 76 धावा, ज्ञानेश्वर बेनके 5 चौकार 22, मयूर जाधव 21 धावा केल्या. सेंट झेवियर्सतर्फे आऊष काळभैरवने 3 तर परीक्षित वांडकरने 2 गडी बाद केले. त्यानंतर सेंट झेवियर्स शालेय संघाने 25 षटकात 3 बाद 97 धावा केल्या.

Advertisement

आऊष काळभैरव 31, चेतन प्रजापत 27 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे वेदांत पोटे व नागेश्वर बेनके यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. श्रेयस बस्तवाडकर सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल ब संघाने नोबेल स्कूल रायबाग संघाचा 157 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केएलई संघाने 25 षटकात 2 बाद 200 धावा केल्या. सलामवीर ओजस गडकरीने शानदार शतक ठोकताना 81 चेंडूत 14 चौकारांसह नाबाद 107 धावा, वरद कुलकर्णी 2 चौकार 27, श्रीकांत शिंत्रे 3 चौकारांसह 23 धावा केल्या. नोबेलतर्फे ओमकार कुंभारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नोबेल संघाचा डाव 13.5 षटकात 43 धावात आटोपला. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. केएलइतर्फे पृथ्वीराज पाटील व अथर्व भेंडीगिरी यांनी प्रत्येकी 3, एस. आर. वर्षानने 2 गडी बाद केले. ओजस गडकरी सामनावीर ठरला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article