For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टिळकवाडी विभागीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

10:14 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
टिळकवाडी विभागीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व श़्री तात्यासाहेंब मुसळे कन्नड स्कुल आयोजित टिळकवाडी विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धाना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या. जिल्हा क्रीडांगणावरती उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश जंबगी, पद्मना एम. जी., अरविंद कांची, मलगौडा पाटील, पीईओ जी. बी. पटेल, परशराम ढगे, टिळकवाडी विभागीय शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, विजय कित्तूर, इमाम सनदी, केदारी ढगे, निवृत्त क्रीडा शिक्षक देवकुमार मंगनाकर, जनगौडा आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे क्रीडापटू परवेज देसाई, नागराज पाटील, अनिकेत देसूरकर, संदेश हिदगेन्नावर यांनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. वैष्णवी रेवणकर हिने सर्व क्रीडापटूंना शपथ देवविली. त्यानंतर निवृत्त क्रीडा शिक्षक देवकुमार मंगनाकर, महावीर जनगौडा व जे. बी. पटेल यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या स्पर्धेत माध्यमिक विभागीय विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टिळकवाडी विभागीय सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.