महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजी पेठेत चुरशीने मतदान

03:32 PM Nov 21, 2024 IST | Radhika Patil
Tight voting in Shivaji Peth
Advertisement

कोल्हापूर : 
उत्तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवाजी पेठेत चुरशीने मतदान झाले. सर्वच मतदान केंद्रात रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्राबाहेरील उमेदवारांच्या बुथवर समर्थकांमध्येही खुन्नस पाहण्यास मिळाली.

Advertisement

कोल्हापूरच्या राजकारणात शिवाजी पेठेला महत्व आहे. पेठेचा पाठिंबा ज्याला मिळतो त्याचा विजय निश्चित मानला जातो. हे यापूर्वीच्या अनेक निवडणुकातून समोर आले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीसाठीही गेल्या 15 दिवसांपासून शिवाजी पेठेतील राजकीय वातावरण तापू लागले होते. बुधवारी मतदान असल्याने गेले दोन दिवस पेठेत प्रचार फेरी, पदयात्रा, गाठीभेटींवर जोर होता. फोडाफोडीचे राजकारणही दिसून आले. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी रात्री उशीरा पडदा मागील हालचालीही सुरू होत्या. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी पेठेत प्रचारासाठी दिवसरात्र एक केला.

Advertisement

शिवाजी पेठेतील मतदारांनी बुधवारी सकाळी 7 पासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. याचबरोबर उमेदवारांचे बुधही मतदार केंद्रावर होते. येथे कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. पक्षाचे चिन्ह असणारे मफलर, टोपी घालूनच ते आले होते. प्रत्येक बुथवर मतदारांना वोटर स्लिप देण्याचे काम सुरू होते. यामध्ये हायटेक यंत्रणेचा वापरही केला होता. तसेच मतदान केंद्रावर उमेदवारांसह नेत्यांनी भेटी देण्याचे सत्र सुरू होते. यामध्ये खासदार शाहू छत्रपती, आमदार जयश्री जाधव, शिवसेना शिंदे गटाचे सुजित चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवाजी पेठेतील बुथवर भेटी दिल्या.

उभा मारूती चौक केंद्रबिंदू
लोकसभा, विधानसभा असो की महापालिकेची निवडणूक शिवाजी पेठेत चुरस ठरलेली असते. विशेष करून उभा मारूती चौक हा शिवाजी पेठेतील राजकीय पेंद्र बिंदू मानला जातो. या ठिकाणी कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे बुथ लागले होते. दोन्हीकडील बुथमध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सायंकाळी 6 वाजता मतदानाचा वेळ संपल्यानंतर या ठिकाणी घोषणाबाजी झाली. महाविकास आघाडीमध्ये चंद्रकांत यादव यांनी मनोगत व्यक्त करून प्रचाराच्या सांगता केली. तर महायुतीच्या बुथवर महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर घोषणाबाजी झाली.

आठ नंबर शाळा मतदान केंद्राच्या परिसरात वाद
शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेतील मतदार केंद्राबाहेर दिव्यांग मतदार आणि मनपा कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. दिव्यांग मतदाराने आणलेली रिक्षा मतदान केंद्राबाहेर काढल्यावरून दिव्यांग मतदार संतप्त झाले होते.

शिवाजी पेठेतील मतदान केंद्राची माहिती
मतदान केंद्राचे नाव                                   मतदान केंद्र
आठ नंबर शाळा                                             11
महाराष्ट्र हायस्कूल, न्यू कॉलेज                            10
दौलतराव भोसले विद्यालय                                  6
देवस्थान समिती कार्यालय                                  1
खराडे कॉलेज                                                  4
ना.पा. हायस्कूल                                               1

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article