कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोयना वन्यजीव विभागात वाघाची डरकाळी

04:29 PM May 19, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

नवारस्ता :

Advertisement

सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पात घनदाट जंगलामध्ये मचाणावर बसून निसर्गप्रेमींनी बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने निसर्गाचा अनुभव घेतला. निसर्गानुभव २०२५ कार्यक्रमांतर्गत पाणवठ्यावरील वन्यप्राणी प्रगणना नुकतीच पार पडली. एकूण ८० मचाणांवर १२० प्रगणकांनी ही वन्यप्राणी गणना केली. या गणनेप्रसंगी कोयना वन्यजीव विभागात वाघाची व बिबट्याची डरकाळी अनुभवयास मिळाली. यात सर्वाधिक गवा, रानडुकरे व रानकोंबड्यांची संख्या आढळून आली.

Advertisement

बुध्द पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळी प्रत्येक वर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यप्राणी प्रगणनेचे GAHYADRI TIGER RESERVE सह्याद्री व्याघ्र राखीव WELCOME आयोजन केले जाते. जंगलातील वन्यप्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ. घट अथवा नवीन प्राण्याची नोंद, तसेच लोकांना वने व वन्यप्राण्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी निसर्गानुभव २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पातील चांदोली वन्यजीव विभागातील अंबा, चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक तर कोयना वन्यजीव विभागातील कोयना, पाटण, बामणोली, कांदाट या वनपरिक्षेत्रात ८० मचाणांवर १२० प्रगणकांची नियुक्ती केली होती.

रात्री ८ ते १० या वेळेत मचाणावर निसर्गप्रमी उपस्थित होते. प्रत्येक मचाणावर दोन अशाप्रकारे १२० प्रगणकांनी ही प्राणीगणना केली. रात्रभर मचाणावर बसून पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी चांदण्या रात्रीत निसर्गप्रमींनीही वन्यप्राण्यांना प्रत्यक्षपणे पाहण्याचा आनंद लुटला.

चांदोली व कोयना वन्यजीव विभागात वाघ (डरकाळी), बिबट्या पाच, रानकुत्रा ५, कोल्हा १, अरवल ११, उदमांजर ९, मुंगूस १०, साळींदर ११, खवले मांजर १, गवा २३४, सांबर २८, रानडुक्कर १०७, भेकर १६, वानर ९, माकड २६, ससा ९, शेकरू २०, खार ४, रानउंदीर ३, वटवाघूळ ६, मोर १५, रानकोंबडा १४०, चकोत्री ३ अशा वन्यजीवांची गणना करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article