Sangli News : उदगिरी परिसरात वाघाचे दर्शन; स्थानिकांमध्ये भीती, पर्यटकांत उत्साह
उदगिरी वाघदर्शनाने भीतीचे वातावरण;
वारणावती: दोन तीन दिवस उदगिरीजवळ वाघाचेदर्शन झाल्याचे उदगिरी परिसरातील व्हिडीओ व्हायलर होत आहे तर उखळू अंबाई वाडा येथे काही नागरिकांना तसेच पर्यटकांनी वाघ दिसल्याचे सांगत आहेत तर काही ठिकाणी वाघाचे ठसे आढळून आले आहेत.
त्यामुळे वाघ हा मानवी वस्ती लगतच असल्याचे चांदोली परिसरातील लोकांत व पर्यटकांच्या चर्चा आहे तर पर्यटकांच्या जल्लोष जरी असला तरी मात्र स्थानिकात मोठी घबराट आहे.एका माजी वन अधिकाऱ्याने नांव न प्रसारीत करण्याच्या अटीवर अशी माहिती दिली की, वाघाचा एरिआ किंवा त्याचे घरचे क्षेत्र तो ठरवतो. वाघ हा एक भटकंती प्राणी आहे जो त्याच्या क्षेत्रात फिरतो. वाधाच्या एरियाचा आकार त्याच्या उपप्रजाती, लभ्यता आणि पर्यावरणावर अवलंबून असतो. त्यामध्ये बंगाल टायगर १०-३० वर्ग किलोमीटर साइबेरियन टायगरः ५०-१०० वर्ग किलोमीटर इंडोचायना टायगरः २०-५० वर्ग किलोमीटर सुमात्रान टायगर १०-२० वर्ग किलोमीटरआहे.
ताडोबातील पकडलेला वाघ कोणत्या एरियातीला आहे तो मानवी वस्ती लगतच्या एरियात असेल तर तो घातक ठरू शकतो. सध्याची वाघीण ही त्याच्या मुळ एरिआतील पकडलेली असले यांची शक्यता फार कमी तर ती सध्याच्या ताडोबातील अतिरिक्त एरिआ मधिल मानवी वस्ती लगतची असण्याची शक्यता आहे. चांदोलीत वाघ होते पण गेल्या तीन दशकांत वाघाचे अस्तित्व नसल्यासारखे होते पण सध्या वाघ हा मानवी वस्ती लगत आल्याने काहीही होऊ शकते. काही विपरित घडण्यापूर्वी वनविभागाने गावोगावी जनजागृती करणे गरजेचे आहे.