सांगलीत शनिवारी सादर होणार संगीत नाटकाचे प्रवेश
सांगली :
येत्या शनिवारी, १९ जुलै २०२४ रोजी सांगली येथे एका विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वररत्न म्युझिक अकॅडमी गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नाकर दिवाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा 'संगीत नाट्यप्रवेश' कार्यक्रम सादर करणार आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली येथे दुपारी ३.३० वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. यामध्ये विविध संगीत प्रकार सादर केले जातील, ज्यात अनेक कलाकार आपली कला सादर करतील. कार्यक्रमाचे काही ठळक विभाग आणि कलाकारः संगीत स्वयंवरः जान्हवी वाकणकर, स्नेहा जोग, प्रज्ञा लोटके, अनुष्का नाईक. संगीत संशयकल्लोळ : रोहिणी शिंगे, आदित्य भोसले, संगीत शारदा : अर्चिता जातू, भार्गवी सप्रे, मृणाली पाटील, जान्हवी तानवडे, जान्हवी वाकणकर, रोहिणी शिंगे, प्रज्ञा लोटके, आदित्य भोसले, संगीत सौभद्रः वृंदा गणपुले, पियूषा कुलकर्णी, संगीत मानपमानः ऋतुजा पटवर्धन, अनुष्का नाईक, कार्यक्रमातील इतर प्रमुख व्यक्तीः नटी-सूत्रधार : सौ. धनश्री कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, दिग्दर्शन : शशांक लिमये, संगीत दिग्दर्शनः सौ. स्वरदा दिवाकर-खाडिलकर, विशेष मार्गदर्शनः राजेंद्र कानिटकर या कार्यक्रमाला अनेक मान्यवर कलावंत साथ देणार आहेत. ज्यामध्ये हार्मोनियमसाठी श्रेयस कुलकर्णी, तबल्यासाठी शिरीष पिंसे, व्हायोलिनसाठी प्रसाद दातार, पार्श्वगायनासाठी श्रावणी वरणकर रंगभूषेसाठी प्रसाद गदे, नेपथ्यासाठी मकरंद कुलकर्णी आणि उदय चव्हाण यांचा समावेश आहे.
यासाठी विशेष सहकार्य सौ. सुलभा ताम्हणकर, सौ. श्रद्धा जोशी-दांडेकर, प्रदीप कुलकर्णी आणि देवल स्मारक मंदिर यांचे लाभले आहे. यावेळी कार्यक्रमाची पहिल्या चार रांगा राखीव असणार आहेत आणि कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. शनिवारी होणाऱ्या या संगीत कार्यक्रमाचा संगीतप्रेमींनी लाभ घेऊन या अविस्मरणीय संगीत सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.