कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara Crime News: खुन्नसने पाहण्यावरून वस्ताऱ्याने युवकावर वार

01:00 PM Aug 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कराडात उर्दू शाळेजवळील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

Advertisement

कराड: खुन्नसने पाहिल्याच्या कारणावरून युवकावर वस्ताऱ्याने वार केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी जखमी युवकाने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वार झाल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख कमाल शेख (वय 22, रा. दौलत कॉलनी, शनिवार पेठ, कराड) हा जोशीवाडा परिसरात गवंडी काम करतो. गुरुवारी रात्री सुमारे 9.10 वाजता तो दिवसाचे काम संपवून घरी जात असताना त्याच्या ओळखीचे सुनील गवळी व पवन खंडाळे (दोघे रा. बाराडबरी, कराड) हे जवळ आले. ‘तू नेहमी आमच्याकडे खुन्नसने का पाहतोस?’ अशी विचारणा करत सुनील गवळी याने वस्तरासदृश हत्याराने शेखच्या छातीवर वार केला.
 पवन खंडाळे याने कानशिलात देत हाताने मारहाण केली. यावेळी दोघांनी शिवीगाळ व दमदाटी करून पळ काढला.
या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. त्याच्या छातीवर टाके पडले आहेत. घटनेनंतर शेखने कराड शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सुनील गवळी व पवन खंडाळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Advertisement
Advertisement
Tags :
#crimenews#karad#karad #satar#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaCase registeredhalf murder casekaradpolice sationsatara news
Next Article