कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पेनमध्ये राजा अन् राणीवर चिखलफेक

06:51 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधानांच्या वाहनावर दगडफेक : पूरसंकटाची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

Advertisement

स्पेन सध्या दशकांनंतर सर्वात भीषण पूरसंकटाला तोंड देत आहे. या पुरामुळे देशात आतापर्यंत 200 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. तर बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत आहे. स्पेनच्या सरकारवर आता पूरग्रस्त लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. स्पेनचे राजे फेलिप आणि राणी लेटिजिया हे पूरग्रस्त पैपार्टा शहराची पाहणी करण्यासाठी पोहोचले असता त्यांना लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. लोकांनी राजा आणि राणीवर चिखल फेकला, शिव्या वाहिल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे.

पैपोर्टा शहरातून राजघराण्याचे शिष्टमंडळ जात असताना पूरप्रभावित लोकांनी राजाच्या विरोधात ‘मारेकरी’ आणि ‘लाज वाटू द्या’ अशा आशयाच्या घोषणा दिल्या आहेत. परंतु यादरम्यान राजा आणि राणीने संयम दाखवत लोकांचे सांत्वन केले आहे. राजा आणि राणीच्या चेहऱ्यावर चिखल लागला होता, तरीही दोघांनी अनेक लोकांची गळाभेट घेत त्यांना धीर दिला आहे.

राजा आणि राणीसोबत स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज आणि वॅलेसिंयन संसदेचे प्रमुख कार्लोस माजोन देखील पोहोचले होते. परंतु जमावाचा संताप कमी झाला नाही. यानंतर पंतप्रधानांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पंतप्रधान सांचेज यांच्यावर अनेक गोष्टी फेकण्यात आल्या.  तसेच त्यांच्या वाहनावर  दगडफेकही करण्यात आली आहे.

पोलिसांकडून बळाचा वापर

स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्पेनच्या पोलिसांनी संतप जमावाला पांगविण्याकरता बळाचा वापर केला आहे. राजा-राणी हे पूरग्रस्त वॅलेसिंया प्रांतातील चिवा शहराची पाहणी करणार होते. परंतु संतप्त जमावामुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे.

लोक नाराज का?

अधिकाऱ्यांकडून पूराचा इशारा देण्यात आला परंतु पुरेसे सहाय्य न करण्यात आल्याने लोक नाराज आहेत. तर दुसरीकडे पूरामुळे झालेल्या नुकसानीदरम्यान मदत अन् बचावकार्य सुरू आहे. आपत्कालीन सेवेचे कर्मचारी लोकांना वाचविण्यासाठी काम करत आहेत. भूमिगत पार्किंग आणि भुयारांमध्ये लोकांचा शोध घेतला जात आहे.

वीज अन् पाण्याची समस्या

स्पेनचे पंतप्रधान सांचेज यांनी 10 हजारांहून अधिक सैनिकांना पूरग्रस्त ठिकाणांवर पाठविण्याचा आदेश दिला आहे. प्रशासन मदत अन् बचावकार्यात कमी पडल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. पूरामुळे अनेक घरांमध्ये गाळ साचला आहे. लोक आता घरांमधून चिखल अन् गाळ हटविण्याचे काम करत आहेत. तर दुसरीकडे पूरसंकटामुळे तेथे वीज अन् पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article