Sangli News : सांगलीत मनपाच्या प्रशासकीय रस्ते दुरुस्तीत धूळफेक
प्रशासकीय कामातील गैरव्यवहारामुळे नागरिक संतप्त
सांगली : सांगली कॉलेज ते माधवनगर रस्त्यावरील रेल्वे ब्रिज या मार्गावरील खड्डे मुजविणेसाठी सिमेंट काँक्रिटचा वापर करण्यात आला पंरतु पाण्याचा वापर न केल्याने सिमेंटचा धुरळ्याने परिसरातील तसेच वाहनचालक यांना या धुळीचा त्रास होत असुन नागरिकांच्या महानगरपालिकेच्या वाहनातून पाण्याचा फवारा करुन देखील धुरळ्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
मागणीनुसार प्रशासकीय कारकिर्दीत केलेल्या या धूळफेकी कामाची नागरिकांनी माजी नगरसेवकांकडे तक्रार सुरू केली आहे. या मार्गावरील असणारी प्रचंड वाहतूक कोंडी व त्या जोडीस धुरळा यामुळे स्थानिक नागरिक व व्यापारी मेटाकुटीस आले असून रस्त्यावरील खड्डे बरे, पण धुरळा नको असा नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक
महापालिकेतूनजगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे.
प्रशासकाच्या काळात झालेले हे काम मात्र लोकांना प्रशासनातील गैरकारभाराचे प्रतीक वाटत आहे. महापालिका आयुक्तांनी खड्डे मुजवण्याचे आदेश दिले तरी इफेक्ट लायबलीटी पिरियडमध्ये असलेल्या रस्त्यांची कंत्राटदारांकडून योग्य पद्धतीने दुरुस्ती करून घेण्याचे धाडस देखील बांधकाम विभाग दाखवू शकत नसल्याने शहरात सर्वत्र अशी कामचलाऊ कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहने घसरणे, धुळीचा त्रास होत आहे. आयुक्तांनी रस्ते दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी होत आहे.