महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोक ओरडत राहिले अन् तो मगरी समोर जात राहिला...

12:27 PM Sep 13, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

सांगली, प्रतिनिधी
समोर मगर आहे आणि त्याला लक्षात कसे येत नाही हे पाहून अस्वस्थ झालेली कृष्णा नदी काठावरील मंडळी ओरडत राहिली आणि पोहण्यात तल्लीन असलेला तो मगरीच्या समोर जात राहिला. नदीत मगरीशी त्याचा सामना झाला.आता सगळं संपलं अशा भावनेने लोकांनी आशा सोडून दिली. ही चित्त थरारक घटना बुधवारी सकाळी सांगलीत कृष्णामाई घाटाजवळ घडली.काहींनी ती मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली म्हणून जगाला समजली!

Advertisement

जलतरणपटू शरद राजदीप यांच्या बाबतीत बुधवारी सकाळी घडलेली ही घटना. मगरीच्या अगदी तोंडासमोर पोहत जाऊन सुद्धा शरद राजदीप सुखरूपपणे बचावले आहेत. या घटनेने मगर नेहमीच धोकादायक असत नाही हे सुद्धा सिद्ध केले आहे.

Advertisement

सांगलीत कृष्णा नदीमध्ये असंख्य लोक दररोज सकाळी पोहायला उतरत असतात.जलतरणपटू शरद रायदीप हे सुद्धा रोज कृष्णा नदीतून पोहण्याचा सराव करतात.सांगलीचा बायपास रस्त्यावरील नवा पूल ते बंधारा या भागात अजस्त्र मगरींचा नेहमीच वावर आहे.दररोज एक मगर त्या मार्गाने पाण्यातून फिरताना लोकांना दिसत असते.वास्तविक मगर हा निशाचर प्राणी असला तरी पाण्यात त्याचा कायम वावर असतो आणि उन्हाच्या वेळेला निर्मनुष्य ठिकाणी मगर उन्हं खात सुस्तावलेली असते. सांगलीवाडीकडील बाजूस एका मळीत एका अजस्त्र मगरीचा ठिकाणा आहे.मात्र या मगरीचा वावर लोकांना सवयीचा असल्यामुळे सांगलीत त्याबाबत फारसा गोंधळ माजत नाही.बुधवारी सकाळी शरद राजदीप हे कृष्णा नदीत सांगलीवाडीकडील बाजूने त्याच मार्गाने पोहण्याचा सराव करत होते.

बहुतांशी जलतरणपटू त्या बाजूने जात असतात.मात्र जवळपास कुठे मगर असणार नाही हे सावधपणे पाहिले जाते.माई घाटाच्या जवळ शरद राजदीप पोहोत येत असताना नेमक्या त्यांच्या विरुद्ध बाजूने एक अजस्त्र मगर पोहोत येत असल्याचे लोकांनी पाहिले.त्यामुळे राजदीप यांना सावध करून मार्ग बदलण्यासाठी लोक जोरजोराने आरडाओरडा करू लागले.लोक इतके ओरडत होते की कोणीही सहज तो आवाज ऐकूनच गडबडले असते. मात्र कानात एअर प्लग घातलेला असल्याने आणि पाण्यात मान खाली घालून पोहण्याचा शरद राजदीप यांचा सराव असल्याने लोकांचा आवाज शरद राजदीप यांच्या कानावर पोहोचलाच नाही किंवा आपल्यासमोर अगदी जवळ अजस्त्र मगर पोहत येत आहे याचा त्यांना पत्ताही लागला नाही. आपल्याच सरावात तल्लीन होत ते मगरीच्या जवळ जवळ जात राहिले.

लोक ओरडतच होते. अजस्त्र मगरीचे पाण्यावर आलेले नाक त्यांना दिसत होते.‌ आता पोहणाऱ्याचे काही खरे नाही.आता मगर झडप घालणार आणि शरद राजदीप मगरीच्या जबड्यात जाणार असे लोकांना वाटू लागले. लोकांचा गोंधळ वाढला. आता हा गेलाच म्हणून साऱ्यांनी अशा सोडली.पण पोहोणारा असहाय मानव समोर असतानाही मगर स्वतःच पाण्याखाली बुडाली. आणि राजदीप कांबळे आपल्याच गतीने मगरीवरून पोहत पुढे गेले! ऐनवेळी हिंस्त्र मगरीने सुद्धा शांततेने आपला मार्ग कापणे पसंत केल्यामुळे एका माणसाचा जीव वाचला इतकेच नव्हे तर मगरीच्या स्वत:चाच रस्ता बदलण्याच्या कृतीमुळे कृष्णेतील मगरींचीही बदनामी थांबली आहे.!

Advertisement
Tags :
#animal#sangli#sanglinews
Next Article