कुपवाडमध्ये गुंडांचा भरादिवसा थरारक पाठलाग! तरूणावर धारदार शस्त्राने हला : दोघे ताब्यात
कुपवाड प्रतिनिधी
कुपवाड शहरात मुख्य रस्त्यावर रविवारी भरदुपारी साडेबाराच्या सुमारास अज्ञात गुंडांनी हातात धारदार शस्त्र घेवून सिनेस्टाईलने थरारक पाठलाग करत एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली.
पूर्वीच्या भांडणाच्या वादातून हा हला झाला असून यात साहिल गौस शेख (वय 22, रा. राजहंस सोसायटी, शांत कॉलनी, कुपवाड) याच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद असून पोलिसांनी दोघे संशयित हलेखोर ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, गुंडांच्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण आहे. हल्यात गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन शेख रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी संशयितांनी रस्त्याकडेला धारदार कोयता टाकून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर, उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या व घटनास्थळी मिळालेल्या माहितींनुसार, जखमी साहिल शेख व संशयित यांच्यात पूर्वीच्या भांडणाचा वाद होता. रविवारी दुपारी जखमी शेख शहरातील अकूज क्रीडा मैदानावर थांबला होता. यावेळी काही तरूण हातात धारदार शस्त्र घेऊन आले. यावेळी पुन्हा वाद झाला. वादावादीत एका संशयिताने शेखच्या डोक्यात वार केला. शेख जीव वाचवण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावऊन पळत जात असताना संशयितांनी हातात धारदार शस्त्र घेऊन त्याचा थरारक पाठलाग केला. हा प्रकार पाहून रस्त्यावरील नागरीक भयभित झाले. शेख एका गलीत घुसला. संशयितांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर हला केला. शेख रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी धारदार कोयता रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला.
दरम्यान, ही घटना नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी जखमीला प्रथम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर खासगी रूग्णालयात दाखल केले. जखमीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर यांना माहिती मिळताच त्यांनी पाोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. हलेखोरांनी हल्यात वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस तपास करीत आहेत.