Miraj Crime News: मिरजेत हत्यारे घेऊन फिरणारे इचलकरंजीचे तिघे गजाआड
एक दुचाकीसह दोन कोयता, दोन चाकू व एक सुरा आदी हत्यारे जप्त करण्यात आली
मिरज: शहरातील शाखी चौक येथे दुचाकीवरुन धारदार हत्यारे घेऊन फिरणाऱ्या इचलकरंजीतील तिघा तरुणांना मिरज शहर पोलीस वण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पथकाने पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून एक दुचाकीसह दोन कोयता, दोन चाकू व एक सुरा आदी हत्यारे जप्त करण्यात आली आहे
अटक करण्यात आलेल्यांमध्ये कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे (वय २०), निखिल नितीन कांबळे (वय १९) आणि अभिषेक अमर कांबळे (वय २०, तिघे रा. इचलकरंजी) यांचा समावेश आहे. संबंधीत तरुण हत्यारे पेऊन मिरज शहरात कशासाठी फिरत होते, याची मिरज जप्त केलेली हत्यारे व अटक केलेल्या संशयीतांसोबत पोलीस
चौकशी सुरु आहे.
शहर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रात्री वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोलिंग राब वून संशयितांची धरपकड सुरु आहे. शाखी चौक येथे एका मोपेड दुचाकीवरुन तिघेजण हत्यारे घेऊन फिरत असत्त्याची माहिती पोत्तिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांच्या प क्काने शास्त्री चौकात सापळा लावून संबंधीत तिघांना पकडले.
त्यांच्याकडे चौकशी करुन अंगझडती घेतली असता, दोन कोयते, दोन चाकू आणि एक सुरा अशी हत्यारे मिळून आली. पोलिसांनी संशयीत तिथा-नाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडीत हत्यारे जप्त केली. याबाबत मिरज शहर पोलिसात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.