कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एमआरआरसाठी तीन वर्षांची प्रतीक्षा

06:02 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वैद्यकीय उपचार आणि त्यांच्यावरील खर्च गेल्या 20 वर्षांमध्ये पुष्कळच वाढला आहे. तुमचा आरोग्य विमा असेल तर या खर्चाची झळ विमा कंपनी सहन करते. तरीही विमा लागू होत नाही, असे खर्च असतातच. सध्या एमआरआय स्कॅनिंग बऱ्याच जणांना करावे लागते. या स्कॅनिंगमधून आपल्या शरिराच्या आतील भागांमध्ये काय दोष लपलेले आहेत याची माहिती मिळते आणि रोगनिदान अचूकपणे करता येते. हे एमआरआय स्कॅनिंग करुन घेण्यासाठी अधिकतर चार ते पाच तासांची प्रतीक्षा आपल्याला करावी लागते. तथापि, दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमआरआय विभागाने एका रुग्णाला हे स्कॅनिंग करण्यासाठी तब्बल तीन वर्षांपुढची वेळ दिल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. या विभागात एमआरआय करुन घेण्यासाठी रुग्णांची इतकी गर्दी होत असते, की विभागाची यंत्रणेची दामछाक होऊ लागली आहे. त्यामुळे तीन वर्षांनंतरचा कालावधी एका रुग्णाला देण्यात आला, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

Advertisement

या एमआरआय आणि अन्य इमेजिंग विभागात प्रतिदिन 15 हजारांहून अधिक रुग्ण नावे नोंदवितात. त्यामुळे प्रतीक्षा सूची प्रचंड प्रमाणात लांबते. तथापि, एका एमआरआयसाठी तीन वर्षे लागणार असतील तर तो रुग्ण तितका काळ तग धरेल का, असा प्रश्न विचारला जात आहे. आता भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये इतकी गर्दी का होते, याचे सरळ उत्तर असे आहे की येथे सर्व प्रकारचे रोगनिदान अत्यल्प किमतीत केले जाते. अनेक रुग्णांना एमआरआयचा खर्चही झेपत नाही. अशा लोकांसाठी सरकारी रुग्णालय हाच आसरा असतो. या संस्थेचे म्हणणे असे की, ज्या रुग्णांना लवकर एमआरआय करुन घ्या असे डॉक्टरांनी सांगितलेले असते, त्यांचे स्कॅनिंग त्वरित करुन दिले जाते. ज्यांना प्रतीक्षा करणे शक्य असते त्यांना विलंबाने बोलाविले जाते. असे असले तरीही तीन वर्षांचा कालावधी हा अनाकलनीय आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. आता दिल्लीतील एम्सने आपली सर्व एमआरआय यंत्रे चोवीस तास चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही प्रतीक्षा सूची बरीच मोठी आहे, असे आढळून येते. उपाय शोधला जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article