महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दागिने चोरणाऱ्या बेळगावच्या तीन महिलांना बागलकोटमध्ये अटक

11:47 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सहा लाखाचे दागिने जप्त

Advertisement

बेळगाव : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने लांबवणाऱ्या बेळगाव येथील तीन महिलांना बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून सहा लाख रुपये किमतीचे 91 ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. रोशनी हरिदास चौगुले (वय 30) रा. रामनगर-वड्डरवाडी, रेणुका रवी वरगंडे (वय 22) रा. गँगवाडी, सविता साईनाथ लोंढे (वय 34) रा. गँगवाडी अशी त्यांची नावे आहेत. बागलकोट शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बेळगाव येथून जाऊन या महिला बागलकोटमध्ये चोरी करीत होत्या.

Advertisement

गेल्या सोमवार दि. 19 ऑगस्ट रोजी बागलकोट शहर बसस्थानकावर हुबळी बसमध्ये चढताना भारती लिंगबसय्या हिरेमठ (वय 38) या महिलेच्या व्हॅनिटी बॅगमधून सुमारे 6 लाख 60 हजार रुपये किमतीचे 11 तोळ्यांचे दागिने चोरीस गेले होते. यासंबंधी बागलकोट शहर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महांतेश्वर जिद्दी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख प्रसन्न देसाई आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुनाथ चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक जे. वाय. नदाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दि. 29 रोजी या तीन महिलांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी बसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याजवळून 91 ग्रॅम 98 मिली सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article