For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसीच्या मागणीत तीन पट वाढ

06:06 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसीच्या मागणीत तीन पट वाढ
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

देशभरात एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरची विक्री यंदा विक्रमी स्तरावरती झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2010 नंतर देशातील एसी खरेदीमध्ये जवळपास तीनपट वाढ झाली आहे.

सध्याला 100 घरांमध्ये 24 वीस एअर कंडिशनर अशी संख्या असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. या उपकरणांमुळे भारतात विजेच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विजेचा सर्वाधिक वापर हा कार्यालयीन वेळेत होत असल्याचेही समोर आले आहे. कारण जवळपास सर्वच कार्यालयांमध्ये आजकाल एसी आणि फ्रीज ही उत्पादने सर्रास वापरली जातात.

Advertisement

मागणी नऊपट वाढणार

सध्याची एसीची मागणी पाहता 2050 पर्यंत भारतात एसीचा वापर करणाऱ्यांची संख्या नऊपट वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदा एकंदर एक कोटी दहा लाख इतके एअर कंडिशनर विकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा एक प्रकारचा विक्रमच मानला जात आहे.

Advertisement
Tags :

.