राज्यात ‘तोयबा’शी संबंधित तीन संशयितांना अटक
02:14 AM Jul 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ बेंगळूर
Advertisement
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एसआयए) मंगळवारी बेंगळूर व कोलारमध्ये एकूण 5 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईवेळी 2023 मधील ‘लष्कर ए तोयबा’च्या प्रकरणासंबंधी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहातील मानसोपचार तज्ञ डॉ. नागराज, परप्पन अग्रहार कारागृहातील एएसआय चांद पाशा आणि फरार दहशतवाद्याची आई अनीस फातिमा अशा तिघांना एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. दहशतदवादी कृत्यांसाठी सहकार्य केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दोन वॉकीटॉकी, सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. तिघांचीही कसून चौकशी केली जात असून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न तपास यंत्रणांकडून सुरू आहेत.
Advertisement
Advertisement
