महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टॉप्स योजनेत तीन स्क्वॅशपटूंचा समावेश

06:19 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात येत असलेल्या क्रीडापटूंच्या विकास योजनेमध्ये (टॉप्स) आता 3 युवा स्क्वॅशपटूंचा समावेश करण्यात आला आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीला आतापासूनच या 3 स्क्वॅशपटूंनी प्रारंभ केला आहे. अनाहत सिंग, अभय सिंग आणि वेलावन सेंथिलकुमार हे स्क्वॅशपटू आता टॉप्समध्ये दाखल झाले आहेत.

Advertisement

2028 साली होणाऱ्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच स्क्वॅश या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्याचा निर्णय गेल्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आला आहे. स्क्वॅश हा क्रीडाप्रकार भारतामध्ये चांगलाच रुजला असून आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय स्क्वॅशपटूंची कामगिरी गेली काही वर्षे सातत्याने होत असल्याची दिसून येते. गेली अनेक वर्षे सौरभ घोषाल, दिपीका पल्लिकल आणि ज्योश्ना चिन्नाप्पा हे जागतिक दर्जाचे स्क्वॅशपटू म्हणून ओळखले जातात. पण आता हे अनुभवी स्क्वॅशपटू आपल्या जबाबदारीचे बॅटन पुढील पिढीतील स्क्वॅशपटूंकडे सोपवित आहेत. नवोदित स्क्वॅशपटूंमध्ये अनाहत, अभय आणि वेलावन यांच्याकडून भविष्यकाळात बरीच अपेक्षा बाळगली जात आहे.

टॉप्स योजनेत स्क्वॅशपटूंचा समावेश करण्यात आल्याने आता भविष्यकाळात या क्रीडा प्रकाराला अधिक प्रोत्साहन मिळेल, अशी आशा अखिल भारतीय स्क्वॅश फेडरेशनचे सचिव सायरस पोंचा यांनी व्यक्त केली आहे. 25 वर्षीय अभय सिंग हा सध्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तसेच नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आहे. अभयने पीएसए विश्व टूरवरील 9 स्क्वॅश स्पर्धा जिंकल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article