महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुरपतवंत सिंग पन्नूच्या तीन मालमत्ता जप्त

06:42 AM Oct 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनआयएची चंदीगडमध्ये कारवाई, जमीनही ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) खलिस्तानी दहशतवादी आणि प्रतिबंधित संघटना शिख फॉर जस्टिसचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याच्या तीन मालमत्ता जप्त केल्या आहेत. पन्नूविरुद्ध सहा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. या संदर्भात एनआयएने चंदीगडमधील मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय अमृतसर आणि पठाणकोटमधील काही जमीनही ताब्यात घेण्यात आली आहे. चंदीगडमध्ये संलग्न असलेल्या तीन मालमत्तांपैकी एक अपार्टमेंट आहे. याशिवाय अमृतसरमधील 46 कनाल आणि पठाणकोटमधील 11 आणि 13 कनाल जमीनही जप्त करण्यात आली आहे. एनआयएने यावषी 15 ऑक्टोबरपर्यंत पन्नूविरोधात एकूण 66 प्रकरणे नोंदवली आहेत.

मूळचा पंजाबी असलेल्या गुरपतवंत सिंग पन्नूकडे सध्या अमेरिकेचे नागरिकत्व आहे. पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर तो परदेशात गेला असून पॅनडा आणि अमेरिकेत राहत आहे. विदेशातूनच तो खलिस्तानी कारवाया करताना वेळोवेळी व्हिडीओ जारी करून भारत सरकारविरोधात विष ओकत असतो. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या मदतीने त्याने शीख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन नावाची दहशतवादी संघटना स्थापन केली असून तयावर भारताने 2019 मध्ये बंदी घातली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article