भूखंडप्रकरणी फसवणूक करणारे तिघेजण गजाआड
कुचेली कोमुनिदादची जागा विकून उकळले लाखो ऊपये
म्हापसा : कुचेली म्हापसा कोमुनिदादच्या जागेत बेकायदेशीररित्या उभारलेली घरे गेल्यावर्षी कोमुनिदादने पोलिस संरक्षणात जमिनदोस्त केली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यावेळी काही महिलांनी एकत्रित येऊन काही दलालांनी त्यांना कोमुनिदादची घरे देतो असे सांगून त्यांच्याकडून लाखो ऊपये उकळल्याचा आरोप केला होता. या प्रकाराची दखल घेत अखेर गुऊवारी रात्री म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपींच्या घरी छापा टाकून तिघांना अटक केली आहे. पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. राज्य सरकारने संपादित केलेल्या कुचेली कोमुनिदाद जागेतील जमिनीचे भूखंड पाडून ते कायदेशीररित्या नावावर करून देतो, असे सांगून तक्रारदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसानी या तिघा संशयितांना अटक केली आहे. राजा अँथनी, सुमित फडते व राजू मांद्रेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हा फसवणुकीचा प्रकार गेल्यावर्षी घडला होता. याप्रकरणी तक्रारदार रिती झा (कुचेली) व इतरांनी पोलिसात तक्रार दिली होती. यावर कारवाई करीत म्हापसा पोलिसांनी वरील तिघाना अटक केली आहे. संशयितांनी या भूखंडातील फिर्यादींना 2000 चौ. मी. जागा विकली होती, या बदल्यात फिर्यादीकडून संशयितांनी 1 लाख 75 हजार ऊपये घेतले होते. मात्र संशयितांनी ही जागा फिर्यादींच्या नावे करून दिली नाही. संशयितांनी वरील भूखंडाचे हक्क ताराच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केले जातील, असे वचन दिले. मात्र संशयितांनी फिर्यादी व इतरांची फसवणूक केल्याने पीडितांनी म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद केला. त्यानुसार वरील तिघाही संशयितांना म्हापसा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
स्मशानभूमीसाठीची जागा
मध्यंतरी याच जागेतील राज्य प्रशासनाने कुचेली कोमुनिनाद जागेत अतिक्रमण करून उभारलेली बेकायदा 36 बांधकामे जमिनदोस्त केली होती. ही जागा सरकारने स्थानिक कोमुनिदादकडून स्मशानभूमी बांधण्यासाठी संपादित केली आहे.