कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिहारमध्ये तीन नवीन ‘अमृत भारत’ रेल्वे सुरू

06:03 AM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिवाळी आणि छठच्या अगदी आधी भारतीय रेल्वेने बिहारला एक मोठी भेट दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवार, 29 सप्टेंबर रोजी तीन नवीन अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या बिहारमधून राजस्थान, दिल्ली आणि तेलंगणा या राज्यांशी जोडण्यात आलेल्या आहेत. या तीन गाड्यांसोबतच रेल्वे विभागाने बिहारला सात नवीन गाड्या जाहीर केल्या आहेत.  याप्रसंगी अश्विनी वैष्णव यांनी छठ आणि दिवाळीसाठी देशभरात 12,000 विशेष गाड्या चालवल्या जातील अशी घोषणाही केली.

Advertisement

अजमेर-दरभंगा, दिल्ली-छापरा आणि मुझफ्फरपूर-हैदराबाद दरम्यान सोमवारपासून तीन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत. या नवीन गाड्या त्यांच्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि कमी भाड्यासाठी ओळखल्या जातात. या गाड्यांमध्ये 11 द्वितीय श्रेणीचे कोच आणि 8 स्लीपर श्रेणीचे कोच आहेत. सध्या देशभरात बारा अमृत भारत गाड्या कार्यरत आहेत. तीन नवीन गाड्या सुरू झाल्यामुळे ही संख्या वाढून 15 झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article