हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात
कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांची माहिती
कारवार : पुणे येथील त्या उद्योजकाच्या हत्या प्रकरणी तीन मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांनी दिली. यापैकी दोन मारेकऱ्यांना दिल्लीत 24 सप्टेंबर रोजी तर अन्य एक मारेकऱ्याला 25 सप्टेंबर रोजी मडगाव-गोवा येथे ताब्यात घेण्यात आले आहे. 24 सप्टेंबर रोजी दिल्लीत ताब्यात घेतलेल्या मारेकऱ्यांची नावे उज्ज्वल जागीर (वय 24, रा. मेहंदनगर, जिल्हा पुर्णीया, बिहार) आणि मासूम मंजूर (वय 23, रा. मेहंदपूर, जिल्हा पुर्णीया, बिहार) अशी आहेत तर बुधवारी मडगाव-गोवा येथे ताब्यात घेतलेल्या मारेकऱ्याचे नाव लक्ष ज्योतीनाथ केनारामनाय (वय 31, रा. बरुवदाल, जिल्हा सोनेटपूर, आसाम) असे आहे. गेल्या रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी कारवार तालुक्यातील सदाशिवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत हणकोण येथील विनायक ऊर्फ राजू काशिनाथ नाईक (वय 58) यांच्या घरात घुसून सुरा, तलवार व लोखंडी रॉडचा प्रहार करून अज्ञातांनी हत्या केली होती.
बेतीत सापडला राणेचा मृतदेह
बेती येथील जुन्या फेरीबोट धक्क्याजवळ आढळून आलेला मृतदेह फोंड्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गुऊप्रसाद राणे यांचा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या मतृदेहासोबत गुऊप्रसाद राणे यांचे ओळखपत्र सापडले आहे. त्याच्या कुटुंबियांनीही मृतदेहाच्या ओळखीची पुष्टी दिली आहे. गुऊप्रसाद राणे याचा कारवारमधील उद्योजकाच्या हत्येत सहभाग असल्याचा संशय असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी राणे यांच्या पत्नीला बोलवले होते. तिनेही मृतदेहाची ओळख केली आहे.
आणखी कोण कोण आहेत गुंतलेले?
कारवार पोलीस उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक याच्या हत्येप्रकरणात संशयित म्हणून फोंड्याचे गुऊप्रसाद राणे यांचा शोध घेत असतानाच त्यांचा मृतदेह पाण्यात आढळल्याने नेमका हा शोध तपास कोणत्या दिशेने जातो, याबाबत गूढ वाढले आहे. कारण कारवारचे पोलीस अधीक्षक के. नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गोव्यात आले आहे. आता राणे यांचाच मृतदेह आढळल्याने नेमके या प्रकरणात आणखी कोण कोण आहेत, त्यादिशेने हा तपास पोलीस करण्याच्या तयारीत आहेत.
प्रेमाच्या चौकोनातून सुपारी देऊन राणे यांनी उद्योगपती विनायक नाईक यांचा खून केल्याचा प्राथमिक अंकाज सदाशिवगड पोलिसांनी व्यक्त केला होता. हत्या करण्यात आलेले विनायक नाईक हे मूळ हणकोण येथील रहिवासी होते. त्यांचा गुऊप्रसाद राणे यांनी या व्यावसायिकाने नेपाळी कामगारांना सुपारी देऊन खून केला होता, असे या हत्येच्या घटनेत अटक केलेल्या संशयितांनी कबूल केलेले आहे. मुळात उद्योगपती विनायक व फोंड्याचे गुऊप्रसाद राणे ह्या दोघांचीही पूर्वीपासून ओळख होती. दोघेही व्यवसायात लखपती बनले होते. परंतु अनैतिक संबंधामुळे उद्योगपती नाईक याचा खून झाला होता.
ज्या ठिकाणी उद्योगपती विनायक नाईक यांच्या खुनाचा प्रकार घडला होता. त्या जवळ असलेल्या एका बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला होता. हल्लेकोर कारमधून पसार झाले होते. कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला असता. ही कार गोव्यातील लोलये-काणकोण येथील असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर कारमालकाकडे अधिक चौकशी केली असता, ही कार फोंड्यातील व्यावसायिक गुऊप्रसाद राणे याने भाडेपट्टीवर घेतल्याचेही स्पष्ट झाले होते.
दोन नेपाळींना म्हापशात अटक
कारवार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करताना हल्लेखोर कामगारांना मंगळवारी म्हापसा येथून अटक केली होती. हे दोघेही संशयित कामगार नेपाळी आहेत. हे गुऊप्रसादकडे कामाला होते. त्यांनाच राणे यांनी सुपारी देऊन उद्योगपती नाईक यांची हत्या केल्याचे तपासात स्पषट झाले आहे. या संशयितांकडून आणखी काही माहिती मिळते का आणि या प्रकरणात कितीजणांचा सहभाग आहे, त्यादिशेने पोलीस तपास करीत आहेत.