आशियाई टेटे स्पर्धेत भारताला तीन पदके
वृत्तसंस्था/ अॅस्टेना (कझाकस्तान)
आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 3 पदके पटकाविली त्यामध्ये महिला दुहेरीच्या ऐतिहासिक कांस्यपदकाचा समावेश आहे. महिलांच्या दुहेरीत भारताच्या अहिका मुखर्जी आणि सुतिर्थ मुखर्जी यांचे आव्हान रविवारी उपांत्य फेरीतच समाप्त झाले.
गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक मिळविणाऱ्या चीनच्या स्पर्धकांना पराभूत करुन उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. महिला दुहेरीत भारताने कांस्यपदकाची कमाई केली. तर अहिका मुखर्जी आणि सुतिर्थ मुखर्जी यांचे दुहेरीतील आव्हान समाप्त झाले.
पुरुषांच्या विभागात भारताने आणखी एक कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत पहिल्यांदाच भारताने कांस्यपदक पटकाविले. दरम्यान भारतीय संघातील अचंता शरद कमल, मानव ठक्कर आणि हरमीत देसाई यांचे आव्हान रविवारी उपांत्य फेरीतच चीन तैपेईकडून संपुष्टात आले. चीन तैपेईने भारतावर 3-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली आहे. पुरुष एकेरीमध्ये मानव ठक्कर आणि मनुश शहा यांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.