भारतीय यू-20 महिला फुटबॉल संघाचे तीन सामने
06:40 AM Jan 29, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
भारताच्या यू-20 वर्षाखालील वयोगटाचा महिला फुटबॉल संघ फेब्रुवारी महिन्यात तुर्कीत 3 फुटबॉल सामने खेळणार आहे. मित्रत्वाचे हे सामने जॉर्डन, हाँगकाँग आणि रशियाबरोबर होणार असल्याचे सांगण्यात आले.
Advertisement
भारत आणि जॉर्डन यांच्यातील पहिला सामना 19 फेब्रुवारीला तर भारत आणि हाँगकाँग यांच्यातील दुसरा सामना 22 फेब्रुवारीला तर भारत आणि रशिया यांच्यातील तिसरा सामना 25 फेब्रुवारीला होणार आहे. येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या महिलांच्या सॅफ यू-20 वर्षाखालील वयोगाटाच्या महिलांच्या फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तसेच ऑगस्टमध्ये होणाऱ्या एएफसी यू-20 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या आशिया चषक पात्र फेरी स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे.
Advertisement