For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार अपघातात तिघे जागीच ठार

10:21 AM Jan 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
कार अपघातात तिघे जागीच ठार
Advertisement

कन्नाळ क्रॉसनजीक भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना : दोघे गंभीर जखमी

Advertisement

वार्ताहर/विजापूर

भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कन्नाळ क्रॉसनजीक शुक्रवारी पहाटे घडली. सदर कार विजापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील झाडावर आदळल्याने वाहनाचा चक्काचूर झाला होता. विजयकुमार रेवणसिद्धप्पा औरंगाबाद (वय 42), अभिषेक शिवाजी सावंत (वय 33, रा. दरबार गल्ली, विजापूर), राजू हणमंतप्पा बिरादार (वय 35, रा. टेकडी गल्ली, विजापूर) अशी मृतांची तर राजू भीमाशंकर कांबळे (वय 39) व विशाल परशुराम पोळ (वय 34) अशी जखमींची नावे आहेत. घटनेविषयी अधिक माहिती अशी, जिह्यातील प्रतिष्ठित सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक विजयकुमार औरंगाबाद, अभिषेक सावंत, राजू बिरादार, राजू कांबळे व विशाल पोळ हे कार क्रमांक केए 28 झेड 5360 मधून महाराष्ट्रातील सोलापूरला गेले होते.

Advertisement

दरम्यान, तेथील काम आटोपून ते विजापूरच्या दिशेने येत होते. अचानक कन्नाळ क्रॉस येथे आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन जोरात आदळली.त्यात विजयकुमार औरंगाबाद, अभिषेक सावंत, राजू बिरादर हे जागीच गतप्राण झाले. तर राजू कांबळे, विशाल पोळ हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना कळविली. त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकर मारिहाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. विजापूर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद विजापूर ग्रामीण पोलीस स्थानकांत झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
Tags :

.