For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रग्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

11:44 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
ड्रग्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
Advertisement

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे प्रतिपादन : गेल्या वर्षभरापासून राज्यात तब्बल 300 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त

Advertisement

बेंगळूर : राज्याला ड्रग्जमुक्त करण्यासाठी सरकारने ड्रग्ज विव्रेते आणि वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. कर्नाटकाला ड्रग्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केले. बेंगळूर शहर पोलीस आणि फेडरेशन ऑफ हिस्टोरिक व्हेईकल्स ऑफ इंडिया (एफएचव्हीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पॉल जॉन रिसॉर्ट्स अँड हॉटेल्समध्ये आयोजित ड्रग्जमुक्त कर्नाटकसाठी विंटेज कार रॅली जागरुकता मोहिमेचे उद्घाटन करून ते बोलत होते. मंत्री परमेश्वर पुढे म्हणाले, केवळ कर्नाटकातच नाही तर जगभरात समाज ड्रग्जच्या व्यसनाकडे वाटचाल करत आहे. ड्रग्जला पाठिंबा देणारे लोक मानव नसून ते लोकांच्या जीवनाशी खेळत आहेत. त्यांचे भविष्य आणि आरोग्य नष्ट करत आहेत. हे लक्षात घेऊन आमच्या सरकारने कर्नाटकला ड्रग्जमुक्त राज्य बनवण्याची घोषणा केली होती.

या घोषणेनंतर कर्नाटक लगेचच ड्रग्जमुक्त झाले असे नाही. आम्ही ते निर्मूलन करण्यासाठी आवश्यक कठोर पावले उचलले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार आणि पोलीस यासाठी कठोर परिश्र्रम करत आहेत. परिणामी, गेल्या वर्षभरापासून तब्बल 300 कोटी ऊपयांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणांशी संबंधित हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. काही अजूनही तुऊंगात आहेत. परदेशातून शिक्षणासाठी आलेले लोकही अशा वाईट कृत्यांमध्ये सहभागी आहेत हे दुर्दैवी आहे, असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. एम. एस. सलीम, बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंत कुमार सिंह, फेडरेशन ऑफ हिस्टॉरिकल व्हेईकल्स इंडियाचे डॉ. रविप्रकाश, चित्रपट अभिनेते मदन पटेल आदींनी या कार्यक्रमात भाग घेतला. विधानसौधसमोर सदर विंटेज कार रॅलीला गृहमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत चालना देण्यात आली.

Advertisement

ड्रग्जपासून दूर राहण्याचे तरुणांना आवाहन

ड्रग्ज तस्कर इतक्मया खालच्या पातळीवर गेले आहेत की ते शाळांमध्ये जाऊन चॅकलेटद्वारे मुलांना मोफत ड्रग्ज वाटू लागले आहेत. ते मुलांना आपले गुलाम बनवत आहेत. यावर आळा घालण्यासाठी पोलीस कठोर कारवाई करत आहेत. विद्यार्थी आणि आयटी पदवीधरांसह तऊणांनी ड्रग्जच्या वापरापासून दूर रहावे, असे आवाहनही गृहमंत्री परमेश्वर यांनी केले.

Advertisement
Tags :

.