महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भुईंज येथून तिघांचे अपहरण; एकावर चाकू हल्ला

12:59 PM Nov 30, 2024 IST | Radhika Patil
Three kidnapped from Bhuinj; one stabbed
Advertisement

भुईज : 
भुईंज हद्दीतून तिघांचे अपहरण करून त्यातील एकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला. जखमी कुडाळ येथील जुबेर शेख याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणातील संशयित आरोपीच्या तपासासाठी भुईंज पोलीस पथक रवाना झाले आहे.

Advertisement

याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी मयुर विकास जाधव (वय 26 वर्षे रा. शेते ता. जावली) हा आपले दोन सहकारी जुबेर शेख (रा. कुडाळ, ता. जावली) व अजय महामुलकर (ता. जावली) यांच्या बरोबर भुईज येथे आला होता. सायंकाळी साडे सहाचे दरम्यान या तिघांना एका स्विफ्ट कारमधून आलेल्या इसमांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना गाडीत बसवले व त्यांना वाठार (ता. कोरेगाव) नजीक आदर्की गावच्या हद्दीत यातील दोघांना गाडीतून ढकलून दिले. तत्पुर्वी त्यांच्यात झालेल्या वादावादी दरम्यान जुबेर शेख याला चाकूने भोकसण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादी मयुर यास दहिवडी (ता. माण) येथे नेण्यात आले.

Advertisement

तेथे बंद घरात डांबून ठेवले होते. यातून मयुरने स्वत:ची सुटका करत तेथून घरी परतला व जखमी जुबेर शेख याची चौकशी करत त्याला पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळाली. घडलेल्या प्रकाराची सुरुवात भुईंज येथून झाल्याने शुकवारी सकाळी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये मयुर याने तक्रार दाखल केली. दिवसभर भुईंज पोलिसांनी तपास यंत्रणा राबवून संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश मिळाले नाही. या गुन्ह्याची नोंद भुईज पोलीस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास सपोनि रमेश गर्जे व गुन्हे प्रकटीकरण विभाग करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article