महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दरड कोसळल्यानंतर उळूवरेतील तीन घरे गंगावळी नदीत

10:42 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धक्कादायक प्रकार उशिरा उघडकीस : काही घरांची पडझड

Advertisement

कारवार : अंकोला तालुक्यातील वासरेकुद्रायो ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील शिरुर येथे मंगळवारी घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर आणखी एक धक्कादायक आणि दुसरी बाजू उशिरा उघडकीस आली आहे. या दुर्घटनेनंतर गंगावळी नदीत आणखी तीन घरे वाहून गेल्याची घटना घडली. शिवाय अन्य काही घरांची पडझड झाली आहे. दोन जनावरे आणि दोन वाहने गंगावळीत वाहून गेली आहेत. चौदा व्यक्ती जखमी झाले आहेत. तर एक वृद्धा बेपत्ता झाली आहे. सदर बेपत्ता वृद्धेचे नाव सीती गौडा (वय 65, रा. उळूवरे) असे आहे.

Advertisement

उशिरा उघडकीस आलेल्या शिरुर घटनेच्या दुसऱ्या बाजूबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, शिरुर दुर्घटना गंगावळी नदीच्या एका काठावर घडली तर दुसऱ्या काठावर उळूवरे हे गाव आहे. शिरुर येथे दरड कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात माती गंगावळी नदीत फेकली गेली. मातीचे ढिगारे नदीत कोसळल्याने नदीतील पाणी त्सुनामीप्रमाणे उळूवरे गावात घुसले आणि बघता बघता उळूवरे येथील तीन घरे, घरांचा पाया वगळता नदीत वाहून गेली.

या शिवाय पाण्याच्या प्रवाहामुळे काही घरांची पडझड झाली. पाण्याच्या विळख्यात सापडलेली दोन वाहने आणि दोन जनावरे वाहून गेली. सीती गौडा ही वृद्धा बेपत्ता झाली आहे. या दुर्घटनेत गणपती गौडा, दिनेश गौडा, महेश गौडा, दीपा गौडा, नागो गौडा, सावित्री गौडा, दिव्या गौडा, होमू गौडा यांच्यासह चौदा व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमींवर कुमठा येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उळूवरे येथील नागरिकांच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे. दरड कोसळल्यानंतर डोंगरावरील मातीचे ढिगारे मोठ्या प्रमाणात गंगावळी नदीत वाहून आले. परिणामी खोल असलेल्या गंगावळी नदीत आता केवळ मातीचे ढिगारेच दिसत आहेत.

तो मृतदेह सापडला

मागील दोन दिवसांपासून पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या बेपत्ता झालेल्या कारवार तालुक्यातील इडूर-चंडीया येथील व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृत व्यक्तीचे नाव अनिल पेडणेकर असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरश: जनजीवन विस्कळीत केले आहे. इडूरला पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे अनिल पेडणेकरसह इडूर येथील काही कुटुंबीयांचे सरकारी प्राथमिक शाळेतील गंजी केंद्रात स्थलांतर करण्यात आले होते. घराकडील जनावरांची व्यवस्था करण्यासाठी गंजी केंद्रातून बाहेर पडलेला पेडणेकर बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह सापडला आहे.

‘त्या’ नुकसानग्रस्तांना धनादेश सुपूर्द

घरावर दरड कोसळून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सव्वासहा लाख रुपयांची मदत सरकारकडून दिली आहे. पालकमंत्री वैद्य यांनी संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन धनादेश सुपूर्द केला. कारवार तालुक्यातील किन्नर येथील निराकार देवालयाजवळ तिर्कस गुरव यांच्या घरावर मंगळवारी दरड कोसळली होती. मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून गुरव गंभीररित्या जखमी झाले होते. उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला होता. त्याकरिता बुधवारी सरकारतर्फे गुरव यांच्या कुटुंबीयांना सव्वासहा लाख रुपयांची मदत करण्यात आली. यापैकी सव्वा लाख रुपये मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना तर पाच लाख रुपये घराच्या नुकसानीबद्दल कुटुंबीयांना मदत म्हणून देण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article