For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्ह्याच्या हल्ल्यात तिघे शेतकरी जखमी

11:27 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोल्ह्याच्या हल्ल्यात तिघे शेतकरी जखमी
Advertisement

गोकाक तालुक्यातील सावळगी येथील घटना

Advertisement

बेळगाव : जनावरांना चारा आणण्यासाठी शेताला गेलेल्या एका वृद्ध शेतकऱ्यासह तिघा जणांवर कोल्ह्याने हल्ला केला आहे. सोमवारी दुपारी गोकाक तालुक्यातील सावळगी येथे ही घटना घडली आहे. गुरुपुत्रप्पा परवन्नी (वय 65) रा. सावळगी असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याच गावातील आणखी दोघा जणांवरही कोल्ह्याने हल्ला केला आहे. रात्री उशिरापर्यंत उपचारासाठी ते बेळगावला येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परवन्नी हे चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली असून त्याच गावातील आणखी दोघे हल्ल्यात जखमी झाले आहेत. वृद्ध शेतकऱ्याची अवस्था पाहून कोल्ह्याच्या हल्ल्यातील इतर जखमींनाही त्वरित बेळगावला बोलाविण्याची सूचना डॉक्टरांनी केली असून रात्री उशिरापर्यंत ते बेळगावात दाखल होणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.