कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अकासा एअरमध्ये तीन कंपन्या हिस्सा खरेदी करणार

06:46 AM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रेमजी इन्व्हेस्टचे अझीम प्रेमजी व मणिपाल समूहाचे रंजन पै यांचा समावेश

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

अकासा एअरची मूळ कंपनी एसएनव्ही एव्हिएशनमध्ये अझीम प्रेमजी इन्व्हेस्ट, रंजन पैचा मणिपाल ग्रुप आणि 360 वन अॅसेट हिस्सा खरेदी करतील. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) बुधवारी या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. तीन्ही कंपन्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये अकासा एअरमध्ये हिस्सा खरेदी करण्यास सहमती दर्शविली होती. तथापि, कंपनी किती हिस्सा खरेदी करेल याची माहिती उघड केलेली नाही.

गुंतवणुकीनंतर, अकासा नवीन उ•ाणे खरेदी करून त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानांच्या फेऱ्या वाढवेल. यामुळे इंडिगो आणि एअर इंडियासारख्या देशांतर्गत विमान कंपन्यांशी ताकदीने स्पर्धा करता येणे कंपनीला शक्य होणार आहे.

पीआय अपॉर्च्युनिटी फंड (पीआयओएफ) : अझीम प्रेमजी आणि प्रेमजी इन्व्हेस्टची जागतिक गुंतवणूक शाखा.

क्लॅपॉन्ड कॅपिटल : मणिपाल ग्रुपच्या रंजन पैचे कुटुंब कार्यालय.

360 वन प्रायव्हेट इक्विटी फंड : 360 वन अॅसेटद्वारे व्यवस्थापित केलेला निधी.

भारतीय विमान बाजारपेठेत अकासा एअरचा वाटा 4.5 टक्के आहे. फेब्रुवारीमध्ये 6.58 लाख प्रवाशांनी अकासा एअरने प्रवास केला. त्याचवेळी,  कामगिरीच्या बाबतीत अकासा एअर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अकासाच्या मते, 78.6 टक्के उड्डाणे वेळेवर आहेत. फेब्रुवारीत देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 1.40 कोटींवर पोहोचली.

भारताची सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सलग तिसऱ्या महिन्यात देशातील सर्वात वक्तशीर विमान कंपनी बनली आहे. इंडिगोचा बाजार हिस्सा 63.7 टक्के झाला आहे. नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालक यांच्या फेब्रुवारी 2025 च्या आकडेवारीनुसार, दिल्ली, मुंबई, बेंगळूरू आणि हैदराबाद सारख्या मेट्रो विमानतळांवर इंडिगोची 80.2 टक्के उड्डाणे वेळेवर होत असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article