For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द.आफ्रिका दौऱ्यासाठी तीन कर्णधार

06:56 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
द आफ्रिका दौऱ्यासाठी तीन कर्णधार
Advertisement

वनडे, टी 20 व कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा : विराट, रोहित केवळ कसोटीमध्ये खेळणार  

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी गुरुवारी (30 नोव्हेंबर) तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका द्रौयावर भारताला तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. टी 20 ची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे, तर केएल राहुल एकदिवसीय मालिकेची कमान सांभाळणार आहे. कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी 20 आणि वनडेमध्ये खेळणार नसल्याचे सांगत ब्रेक घेतला आहे.

Advertisement

रहाणे-पुजाराला डच्चू

35 वर्षीय अजिंक्य रहाणेला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तो विशेष काही करू शकला नाही. याचबरोबर चेतेश्वर पुजारालाही कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. पुजारा शेवटचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. के.एल.राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. श्रेयसने या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्याचवेळी राहुलने या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. बुमराहचे तब्बल दीड वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. जुलै 2022 मध्ये त्याने अखेरची कसोटी इंग्लंडविरुद्ध खेळली होती. बुमराहची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

साई सुदर्शन, रिंकू सिंग वनडेत नवे चेहरे, संजू सॅमसनला संधी

नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली हे वनडे व टी 20 मालिकेत खेळणार नाहीत. या दोघांनाही या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. वनडेत केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून साई सुदर्शन, रजत पाटिदार व रिंकू सिंग हे दोघे नवे चेहरे दिसणार आहेत. याशिवाय, संजू सॅमसन व युझवेंद्र चहलचे देखील वनडेत पुनरागमन झाले आहे. सुर्यकुमार यादवला वनडे संघात स्थान मिळाले नाही. तो सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने त्याला वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

Team announced for T20 series, Suryakumar to lead

टी 20 मालिकेसाठी सुर्यकुमार यादवकडे धुरा

सुर्यकुमार यादव आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर रवींद्र जडेजा उपकर्णधार असेल. तर हार्दिक पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे या मालिकेत टीम इंडियाचा भाग नाही. इशान किशन आणि जितेश शर्मा या दोघांची विकेटकीपर फलंदाज म्हणून संघात निवड झाली आहे.  मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर आणि अर्शदीप सिंग यांच्या रूपाने चार वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. तर वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे फिरकीपटू आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. टीम इंडियाचा आफ्रिका दौरा 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेने सुरू होईल, यानंतर 3 वनडे सामने खेळवले जातील आणि शेवटी दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. टी 20 मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबरला होणार आहे.

आफ्रिका दौऱ्यासाठी संपूर्ण भारतीय संघ -

द.आफ्रिका दौऱ्यासाठी टी 20 संघ - यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकिपर.), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार व दीपक चहर.

द.आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघ - ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटिदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार व शार्दुल ठाकूर.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक -

पहिला टी 20 सामना - 10 डिसेंबर, डर्बन

दुसरा टी 20 सामना - 12 डिसेंबर, सेंट जॉर्ज पार्क

तिसरा टी 20 सामना - 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग

पहिला वनडे सामना - 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग

दुसरा वनडे सामना - 19 डिसेंबर, सेंट जॉर्ज पार्क

तिसरा वनडे सामना - 21 डिसेंबर, पार्ल

पहिली कसोटी - 26 ते 30 डिसेंबर, सेंच्युरियन

दुसरी कसोटी - 3 ते 7 जानेवारी, केप टाऊन.

Advertisement
Tags :

.