अमरनाथ यात्रेदरम्यान तीन बसची धडक
06:13 AM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
दहाहून अधिक भाविक जखमी
Advertisement
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिह्यातील खुदवानी भागात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर अमरनाथ यात्रेच्या ताफ्यादरम्यान तीन बसची टक्कर झाली. या अपघातात 10 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. बालटालकडे जाणाऱ्या यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्याने ताचलू क्रॉसिंगजवळ हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या सर्व भाविकांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक उपचार दिल्यानंतर नऊ भाविकांना अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) येथे पाठवण्यात आले आहे. प्रशासनाने यात्रेकरूंची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. तसेच भाविक व प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Advertisement
Advertisement