Miraj : मिरजेत शिवसेनेच्या तीन शाखांचे उद्घाटन
मिरज शहरातील प्रभाग २ व ३ मध्ये शिवसेना शाखांचा भव्य उद्घाटन सोहळा
मिरज : शहरातील प्रभाग क्र. २ व ३ मध्ये शिवसेन (उध्दव ठाकरे) पक्षाच्या तीन शाखांचे उद्घाटन शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विशालसिंग राजपूत यांच्या हस्ते झाले. या शाखांच्या माध्यमातून शिवसैनिकांना हक्काचे राजकीय व्यासपीठ मिळाले असून, शिवसेना बाढीसाठी काम करावे, असे आवाहन रजपूत यांनी केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुसंघाने शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. प्रभाग क्रमांक २ व ३ मधील १०० फुटी रोड, उस्मानिया मोहल्ला व अलंकार कॉलनी येथे ३ शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचे उद्घाटन विशालसिंग रजपूत यांच्या हस्ते झाले. या शाखेचे नियोजन युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरावत व युवासेना मिरज शहर प्रमुख पै. कुबेरसिंग राजपूत यांच्याकडून करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे, मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले, बाळासाहेब हत्तेकर, कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल संकपाळ, मिरज शहर संघटक महेश लोंढे, पॉल चाको, उपशहर प्रमुख अब्दुल मोमीन, उपशहर प्रमुख उमेश आयरेकर, विभाग प्रमुख मानतेश भोसले, उपशहर संघटक बबन गायकवाड, शुभम कांबळे, मिरज शहर समन्वयक फिरोज मुलाणी, महिला आघाडी शहर संघटिका शकीरा जमादार, सानिया पठाण व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.