महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विजापूरच्या तीन दुचाकीचोरांना अटक

10:15 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तब्बल सात लाखाच्या 14 मोटारसायकली जप्त : बेळगाव-खडेबाजार पोलिसांची कामगिरी

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यात मोटारसायकली चोरणाऱ्या एका त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे. खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या 14 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, ए. बी. शेट्टी, बी. एस. रुद्रापूर, एम. व्ही. अरळगुंडी, व्ही. वाय. गुडीमेत्री, जी. पी. अंबी, आर. बी. गणी, पी. एस. मादर व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, एम. एस. काशीद आदींनी ही कारवाई केली आहे. महेश निंगाप्पा मादर (वय 23), अमीर बाबू येळगी (वय 19), प्रशांत गोपाल मोरे (वय 21) तिघेही राहणार अथरगा, ता. इंडी, जि. विजापूर अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. 18 जून 2023 रोजी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या टीव्हीएस अपाचे मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी या त्रिकुटाला अटक केली आहे.

Advertisement

केवळ बेळगाव शहरच नव्हे तर अथणी, विजापूर, सोलापूर व गोव्यातही मोटारसायकली चोरल्याची कबुली त्यांनी दिली असून त्यांच्याजवळून 1 टीव्हीएस अपाचे मोटारसायकल, 2 बजाज पल्सर, 5 स्प्लेंडर प्लस, 2 होंडा शाईन, 1 बजाज प्लॅटिना, 1 स्प्लेंडर प्रो अशा 6 लाख 79 हजार रुपये किमतीच्या 14 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या त्रिकुटाने खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 4, अथणी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 1, विजापूर येथील जलनगर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 1 मोटारसायकल चोरल्याचे उघडकीस आले असून उर्वरित मोटारसायकली त्यांनी कुठून चोरल्या? याचा तपास करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांकडून बक्षीस

मोटारसायकली चोरणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारी टोळीतील त्रिकुटाच्या मुसक्या आवळणाऱ्या खडेबाजार पोलिसांना पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी शाबासकी दिली असून 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article