कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानांना धमकीचा ई-मेल

10:36 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्फोट घडविण्याची धमकी : आरोपी तामिळनाडूतील असल्याचा संशय

Advertisement

बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना ई-मेलद्वारे त्यांची निवासस्थाने बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील एका व्यक्तीने ही धमकी दिल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. 11 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूच्या डीजीपींना एका विशिष्ट आयडीवरून ई-मेल आला. त्यांनी त्वरित कर्नाटक पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क केले. त्यानंतर खबरदारी उपाययोजना करण्यात आल्या. ashwinshekher@outlook.com वरून आलेल्या ई-मेलमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चार आरडीएक्स आणि सुधारित आयईडी ठेवण्यात आले असून रिमोटच्या साहाय्याने त्यांचा स्फोट घडविण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती.

Advertisement

याविषयी माहिती मिळताच बॉम्ब निकामी पथक आणि बॉम्ब निकामी पथकाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात तपासणी केली. कोठेही स्फोटके आढळली नाहीत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 351(4) आणि 353(1)(ब) अंतर्गत बेंगळूरच्या हलसूर गेट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तामिळनाडूतील एका व्यक्तीचा ई-मेल आयडी ट्रॅक करण्यात आला असून त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून धमक्यांचे ई-मेल येत असल्याने याचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहेत. धमकीच्या संदेशांची गांभीर्याने दखल घेतली जात आहे, अशी माहिती बेंगळूर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article