मिरजेत २० हजारांच्या खंडणीसाठी हॉटेल चालकाला धमकी! गुंड म्हमद्या नदाफसह महिलेवर गुन्हा दाखल
मिरज प्रतिनिधी
हॉटेल चालवायचे असेल तर महिन्याला 20 हजार रूपये खंडणी देण्याची मागणी करत सांगलीतील गुंड म्हमद्या नदाफ याने शहरातील हॉटेल चालकाला धमकी दिली. तसेच महिलेचे पैसे परत न दिल्यास पत्नीची समाजात बदनामी करण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी नूर हॉटेलचे मालक मोहम्मद युसूफ उर्फ शोएब साहेबपीर चमनमलिक (26, रा. टाकळी रोड, गोदड मळा, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित म्हमद्या नदाफसह एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.
चमनमलिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते हॉटेलजवळ थांबले असताना संशयीत म्हमद्या नदाफ हा तेथे आला. त्याने चमनमलिक यांची अडवणूक कjtन शिवीगाळ केली. तू माझ्या धंद्याच्या आडवा येत आहेस. आडवा आलास तर तूला जीवंत सोडत नाही. नूर हॉटेल चालवायचे असेल तर आम्हाला महिन्याला 20 हजार ऊपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली. म्हमद्यासोबत असलेल्या अन्य संशयितांनीही तू भाईसोबत पंगा घेतला आहेस. तूला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
त्यानंतर सुंदरनगर येथील सरफराज अस्लम देसाई यांना घरी बोलावून घेतले. तेथे असलेल्या महिलेने दरवाजा बंद केला. तेथेही महिलेचे घेतलेले पैसे परत दे, नाही तर तुझ्या पत्नीची समाजात बदनामी करेन, अशी धमकी दिली. तसेच पैसे दिल्याशिवाय साक्षीदाराला सोडणार नाही, अशी धमकी दिली. घडल्या प्रकारानंतर चमनमलिक यांनी मिरज शहर पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार म्हमद्या नदाफसह महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.