कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी

12:48 PM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बनावट ई-मेलमुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ : मुख्यमंत्र्यांनी पोलिस सुरक्षा यंत्रणेसमवेत घेतली विशेष बैठक

Advertisement

पणजी : उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देऊ, असा एक ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने शुक्रवारी सकाळी सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली होती. एटीएस पोलिस विभागाच्या पोलिसांसह अन्य पोलिस मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच कार्यालय खाली केले. या इमारतीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले होते. पोलिसांनी जिल्हाधिकारी इमारतीत ठिकठिकाणी शोधाशोध केली. पोलिसांच्या श्वानपथक तसेच दहशतवाद विरोधी पथकाने कार्यालयाची झाडाझडती घेतली. दुपारी पोलिसांकडून कार्यालयात शोध घेण्यात आला होता, मात्र बॉम्ब सापडला नाही. दुपारी 3 वाजता बाम्ब फुटणार, असे ई-मेल मध्ये म्हटले होते. त्यानुसार पोलिस संध्याकाळपर्यत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तैनात होते, मात्र काहीच झाले नसल्याने ई-मेल खोटा असल्याचे उघड झाले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांची पोलिस यंत्रणेसोबत बैठक

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस सुरक्षा यंत्रणेसमवेत विशेष बैठक घेतली. राज्यातील सुरक्षेचा तसेच आपत्कालिन परिस्थितीच्या तयारीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेतला.

पोलिसांकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी 

भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई हल्ले व ब्लॅकआऊट संदर्भात उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये ड्रोन उडविण्यावर कडक बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर हवाई हल्ले व ब्लॅकआऊटचा इशारा जारी झाला तर नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे, शक्यतो घरातून बाहेर पडू नये, मोबाईलचा वापर करू नये, घरातील व बाहेरील लाईट्स बंद ठेवाव्यात, सार्वजनिक व खासगी वाहनांचा वापर टाळावा आदी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article