सत्तरीतील हजारो महिलांनी पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’
आरोग्यमंत्री राणे यांच्या पुढाकाराने पणजी आयनॉक्समध्ये आयोजन : चित्रपटाचा अनुभव हा खास क्षण-राणे
पणजी : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल सोमवारी सत्तरी तालुक्यातील हजारो महिलांना एकत्र चित्रपट पाहता यावा, यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी पणजी येथील आयनॉक्स चित्रपटगृहातील सर्व क्रिनिंग बूक करून महिलांना चित्रपट पाहण्याचा आनंद प्राप्त करून दिला. सत्तरी तालुक्यातील सुमारे 2 हजार महिलांनी पणजी येथील आयनॉक्स चित्रपटगृहात उपस्थित राहून काल सोमवारी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाचा आनंद लुटला. या चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी मीही त्यांच्यासोबत सामील झालो. हा क्षण आपल्यासाठी खास होता, असे उद्गार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काढले. महिलांना आपल्या संसारातून वेळ काढणे मुश्कील होते. त्यांना एकत्रित आणण्याबरोबरच त्यांनाही चित्रपटाचा आनंद मिळावा, यासाठी आपण प्रयत्न केले आणि त्याला सत्तरीतील महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने समाधान वाटते, असेही मंत्री राणे म्हणाले.