जलसफरीत बुडाले 25 पर्यटक
तेरा जणांचे पोफळकर कुटुंब खेड-रत्नागिरीचे
गिरीश मांद्रेकर/ म्हापसा
खेड-रत्नागिरी येथील पोफळकर कुटुंबातील 13 जण बुधवारी सकाळी कळंगूट समुद्रकिनाऱ्यावर जलसफरीसाठी आले असता या पर्यटकांना घेऊन समुद्रात गेलेली जलसफर बोट क्षमतेपेक्षा जास्तजण बोटीत बसविल्याने उलटली. या जलसफरीत 13 जणाना बसविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात 23 जणांना बसविण्यात आले होते, अशी माहिती पर्यटकांनी आणि प्रत्यक्षदर्शीनी दै. तऊण भारतला दिली. या घटनेत सूर्यकांत रामभाऊ पोफळकर (वय 45 वर्षे, रा. खेड रत्नागिरी) या लाईनमनचा मृत्यू झाला. त्यांच्याच कुटुंबातील पाच वर्षीय मुलासह पाचजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसविल्याने वजन वाढले, परिणामी आपले पती सूर्यकांत यांना मरण आल्याचा आरोप पत्नी श्रीमती सारिका सूर्यकांत पोफळकर यांनी केला आहे. याबाबत किनारी पोलिसस्थानकाचे निरीक्षक अजित उमर्ये यांनी उपअधीक्षक सलीम शेख यांच्या उपस्थितीत श्रीमती पोफळकर यांची जबानी लेखी नोंदवून घेतली आहे.
क्षमतेपेक्षा अधिक वजनाने बोट बुडाली
जलसफरीमध्ये 10 अधिक 1 असे अकरा प्रवासी बसविता येतात, मात्र बुडालेल्या जलसफारीमध्ये तब्बल 25 प्रवाशांचा भरणा केला होता, अशी माहिती बोटीतील पर्यटकांनी आपल्या जबानीत दिली आहे. त्यामुळे आता किनारी व पर्यटक पोलिस कोणती भूमिका बजावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या जलसफर बोटीच्या मालकाचे नातेवाईक तथा कळंगुटचे पंच सदस्य आलेक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार जलसफरीच्या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बोट बंद पडली आणि उलटली.
इंजिन बंद पडल्याची माहिती खोटी?
मात्र इंजिन बंद पडल्याची माहिती खोटी आहे, बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्याने वाढत्या वजनामुळे बोट उलटली व समुद्रात बुडाली असल्याचे पर्यटकांनी ठामपणे सांगितले.
पोलिस अधिकारीवर्गाची धावपळ
घटनेची माहिती मिळाल्यवर कळंगुट पोलिसस्थानकाचे निरीक्षक परेश नाईक, किनारी पोलिस निरीक्षक अजित उमर्ये, उपअधीक्षक सलीम शेख, निरीक्षक जतीन पोतदार, निरीक्षक गौरीश मळीक, पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान रामा नाईक, दिनेश गावडे, प्रितेश म्हालदार, स्वप्नील नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवरक्षकांनी तातडीने धावपळ करून बुडणाऱ्यांना पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नियम धाब्यावर बसवून होतात जलसफरी
कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर राजकीय गॉडफादरच्या कृपाशीर्वादाने नियम धाब्यावर बसवून जलसफारी चालत असल्याची माहिती मिळाली आहे. कमी वेळेत जादा पैशांच्या हव्यासापोटी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना-पर्यटकांना जलसफरीत बसविण्यात येते. अशा प्रकारातून आजची दुर्घटना घडल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बोलताना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जॉन वॉटर स्पोर्ट्स या जलसफर बोटीवर ही घटना घडली असून अँथोनी गुदिन्हो यांच्या मालकीची ही बोट आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर बोटमालक अँथोनी गुदिन्हो, मिना गुदिन्हो यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
जीव रक्षक सुजन नागवेकरची धाडसी कामगिरी
घटनेची माहिती मिळाल्यावर किनाऱ्यावरील जीव रक्षकांनी तातडीने हालचाल केल्या. पाण्यात पडलेल्या पर्यटकांना वाचविण्यास सुऊवात केली. जीव रक्षक सुजन सिताराम नागवेकर यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाच वर्षीय विहान पोफळकर व शौर्य चिंचिणकर यांना आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्याने त्या दोघांचा जीव वाचला. त्यांच्या पोटात गेलेले पाणी त्वरित बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला असल्याची माहिती कांदोळी आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी दिली. नंतर त्यांना गोमेकॉत पाठविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
श्रीतिरुपती बालाजीच्या दर्शनाचे स्वप्न अधुरे राहिले
या बोट दुर्घटनेत संचिता पोफळकर, सारिका पोफळकर, राजन, शौर्य, सूर्यकांत, जयंत, विशाल, रेश्मा, भारती, सुरज, विहान, निवृत्ती, जयश्री असे पोफळकर कुटंबीय आणि चिंचविणकर कुटुंबातील दोन पर्यटक होते. हे पर्यटक दोन गाड्यांतून खेड रत्नागिरीहून कळंगूट समुद्रकिनाऱ्यावर फक्त जलसफरीसाठी उतरले होते. त्यानंतर अवघ्या अर्धा तासात ते थेट देवदर्शनासाठी तिरुपतीला जाणार होते. मात्र जलसफरीत कुटुंब प्रमुख सूर्यकांत पोफळकर यांचा बुडून मृत्यू झाल्याने तिऊपतीला जाण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.
लाईफ जॅकेट न दिल्यामुळे मुली सापडल्या संकटात
काही लोकप्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार या जलसफरीसाठी सुरक्षा व्यवस्था नाही. बोटी चालविणारे कर्मचारी परप्रांतीय आहेत. येथे काहीवेळा पर्यटकांना लुटण्याचे प्रकारही घडत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. प्रति जलसफरीसाठी प्रत्येकी 1 हजार, दीड हजार, तसेच 2 किंवा 3 हजार रुपयेही उळकले जातात, अशी कैफियत पर्यटकांनी मांडली. विशेष म्हणजे पोफळकर कुटुंबात दोन पाच वर्षांची मुले होती. त्यांना लाईफ जॅकेट पुरवितो असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात बोटमध्ये चढल्यावर लाईफ जॅकेट देण्यात आले नाही, अशी माहिती मयत सूर्यकांतच्या पत्नी सारिका पोफळकर यांनी पोलिसांना आपल्या जबानीत दिली आहे. आता त्याच दोघा मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु