For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबरा यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही हजारो भक्तांचा रथोत्सवात भाग

11:22 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांबरा यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही हजारो भक्तांचा रथोत्सवात भाग
Advertisement

1950 सालचा 7 अंकणांचा 60 फुटी रथ आकर्षण

Advertisement

वार्ताहर /सांबरा

भंडाऱ्याची उधळण करत व श्री लक्ष्मीदेवीच्या जयजयकारात बुधवारी सांबरा येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही हजारो भक्तांनी रथोत्सवात भाग घेऊन रथ ओढला. बुधवारी सकाळी चावडी गल्लीतील शिवानंद कुलकर्णी यांच्या घरापासून रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. रथ मिरवणुकीत तऊणाई बँडच्या तालावर बेभान होऊन नाचत होती. त्या पाठोपाठ पारंपरिक धनगरी वाद्य होते. गावातील हजारो युवक व आबालवृद्ध रथ ओढण्यासाठी सहभागी झाले होते. यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात येत होती. भंडाऱ्याची उधळण, देवीचा जयजयकार व पारंपरिक वाद्य यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

Advertisement

असा आहे देवीचा रथ

रथाची उंची अंदाजे 60 फूट असून तो 7 अंकणांचा (थरांचा) आहे. प्रत्येक थरामध्ये 42 खांबांचा समावेश आहे. हा रथ 1950 साली झालेल्या श्री महालक्ष्मी यात्रेसाठी बनविण्यात आला होता. तोच रथ अजूनही भक्कम असून या यात्रेतही वापरात आणला आहे. या रथाच्या सजावटीचे काम गावातील कलाकार कल्लाप्पा सोनजी व अनेक तऊणांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन पूर्णत्त्वास नेले आहे.

रथोत्सवाचा गुरूवारचा मार्ग

शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, माऊती गल्ली, लक्ष्मी गल्लीतील लक्ष्मी मंदिर.

Advertisement
Tags :

.