हजारो भाविक रेणुकादेवीच्या चरणी लिन! मंदिर परिसर भाविकांनी फुलला
भंडाऱ्याच्या उधळणीत देवीचा पालखी सोहळा संपन्न, जमदग्नी ऋषी मंदिरात महिलांनी केला कंकण विमोचनाचा
कोल्हापूर प्रतिनिधी
सौंदत्ती डोंगरावरील रेणुकादेवीची यात्रा व रांडव पौर्णिमेचे औचित्य साधून हजारो भाविकांनी यल्लमाच्या ओढ्यावरील रेणुकादेवीचे सोमवारी दर्शन घेऊन मनोकामना मांडली. जशी सौंदत्ती डोंगरावरील रेणुकादेवीची पूजाअर्च्चा केली जाते, तशी येथील रेणुकादेवी मंदिरातही पूजाअर्च्चा करण्यात आली. हजारोंच्या संख्येने भाविकांनी मंदिरात दाखल होऊन सकाळी रेणुकादेवीची बांधलेल्या भरपूजेचे व सायंकाळी पांढऱ्या साडीने बांधलेल्या महापूजेचे दर्शन घेऊन उदं ग आई उदंचा गजर केला. रात्री आठ वाजता देवीचा पालखी सोहळा तर साडे नऊ वाजता जमदग्नी ऋषी मंदिरात कंकण विमोचन सोहळा साजरा केला. यात शेकडो महिलांनी हातातील काकणे वाढवून देवीचे नामस्मरण केले.
परंपरेनुसार पहाटे रेणुकादेवीला अभिषेक करून तिची भरपूजा बांधली. या पुजेचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक, जोगती यांच्या उपस्थितीत देवीची आरतीही केली. सकाळी 9 नंतर दर्शन घेण्यासाठी गर्दी व्हायला सुऊवात झाली. दर्शन घेतेवेळी भाविकांनी क्षणाक्षणाला केलेल्या ‘उदं ग आई उदं’च्या अखंड गजराने मंदिर व परिसर दुमदुमन जात होता. दुपारी रेणुकादेवीची महाआरती केली. यानंतर देवीला पुन्हा अभिषेक कऊन तिची पांढऱ्या साडीने वैधव्य पूजा बांधली. या पुजेचे दर्शन घेण्यासाठी स्थानिकांसह परगावांनमधील भाविकांनी गर्दी केल्याने मंदिर परिसर फुलून गेला. उदं ग आई उदंच्या केल्या गेलेल्या अखंड गजराने तर मंदिर पुन्हा दुमदुमू लागला. रात्री देवीचा पालखी सोहळा झाला. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखीने कंकण विमोचन सोहळ्यासाठी जमदग्नी ऋषी मंदिराकडे प्रस्थान केले. मंदिरात गेल्याने विविध धार्मिक विधी कऊन जोगतींसोबत कंकण ा†वमोचन केले. त्यांच्या पाठोपाठ शेकडो महिलांनी हातातील काकणे वाढवली. यानंतर काकणांचे तुकडे मंदिरात केलेल्या होमाला अर्पण कऊन पालखीने पुन्हा रेणुकादेवी मंदिराकडे प्रस्थान केले. मंदिरात आल्यानंतर देवीच्या नावाचा जयघोष करत पालखीने मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या. यानंतर पालखी सोहळ्यासह धार्मिक विंधीचीही सांगता केली.
केवड्याच्या बनात देवीला अभिषेक...
रात्री साडे आठ वाजता रेणुकादेवीचा पालखी सोहळा संपन्न झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीत रेणुकादेवीची मूर्तीची विराजमान कऊन तिचे जोगतींच्या हस्ते पुजन केले. यानंतर मानकरी, जोगती व भाविकांनी पालखीला खांद्यावर घेऊन मंदिरामागील ओढ्याजवळील केवड्याच्या बनात नेले. येथे मूर्तीला अभिषेक कऊन पांढऱ्या रंगाच्या साडी नेसवली. केवड्याच्या बनातून मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखीने जमदग्नी ऋषी मंदिराकडे कंकण विमोचन सोहळ्यासाठी प्रस्थान केले.