For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'त्या' सात पारंपरिक मच्छीमारांचे मालवणात जल्लोषी स्वागत

03:05 PM Nov 08, 2023 IST | अनुजा कुडतरकर
 त्या  सात पारंपरिक मच्छीमारांचे मालवणात जल्लोषी स्वागत
Advertisement

पर्ससीन ट्रॉलर तोडफोड आणि खलाशी मारहाण प्रकरणात जामिनावर सुटका

Advertisement

मालवण - :

तळाशील समोरील समुद्रात पर्ससीन ट्रॉलर तोडफोड आणि खलाशी मारहाणप्रकरणी अटकेत असलेल्या 'त्या' सात पारंपरिक मच्छीमारांची जामिनावर सुटका झाल्यानंतर भरड नाका येथे त्यांचे पारंपरिक मच्छीमारांकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. सातही मच्छीमारांना पुष्पहार घालून लाडु वाटून मच्छीमारांनी सुटकेचा आनंद साजरा केला. भरड रिक्षा संघटनेनेही पारंपरिक मच्छीमारांना पाठिंबा दर्शवत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.