यंदाची पुणे मॅरेथॉन 1 डिसेंबर रोजी
साधारण दहा हजार धावपटू होणार सहभागी
पुणे / प्रतिनिधी
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टतर्फे यंदाची 38 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी पहाटे सुरू होणार आहे. या स्पर्धेत सर्व गटात मिळून 8 ते 10 हजार खेळाडू सहभागी होतील. इथिओपिया, केनिया टांझानिया, नेपाळ आदी परदेशातील 70 दिग्गज पुऊष, महिला धावपटू सहभागी होणार आहेत. त्यांना ज्योती गवते, मनीषा जोशी या महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय महिला धावपटू तसेच सेनादल, पोलिस दलातील धावपटू कडवी झुंज देतील, अशी माहिती मॅरेथॉन समितीचे अध्यक्ष व विश्वस्त अॅड. अभय छाजेड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत बोलताना अॅड. छाजेड म्हणाले, 42.195 किमी ची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा पहाटे 3 वाजता सणस मैदानावरून सुरू होईल, त्यानंतर पहाटे 3.30 वाजता हाफ मॅरेथॉन 21.0975 किमी, सकाळी 6.30 वा. 10 किमी तसेच 7 वा. 5 किमी ची शर्यत ( सर्व रेसेस पुऊष आणि महिला गट) आणि सकाळी 7.15 वा. 3 किमीची व्हील चेअर अशा क्रमाने रेसेस सोडण्यात येतील. प्रारंभ सणस मैदानातील ट्रॅक वरून होईल, सारसबागमार्गे महालक्ष्मी चौक उजवीकडे वळून सरळ दांडेकर ब्रीज चौकमार्गे सिंहगड रस्ता, गणेश मळा, विट्ठलवाडी, आनंद हॉल, नांदेड सिटी चौक, उजवीकडे वळून नांदेड सिटीमध्ये आत 2 किमी जाऊन ( 10.5 किमी अंतर जन) परत याचमार्गे सणस मैदानावर एक फेरी पूर्ण करून दुसरी फेरी घेतील (पूर्ण मॅरेथॉन साठी). इतर स्पर्धा याच मार्गावर आयोजित केल्या जातील. त्यांचे टर्निंग पॉईंटस वेगळे असून, तेथून धावपटू परत सणस मैदानात येऊन स्पर्धा समाप्त करतील.
या स्पर्धेसाठी संपूर्ण मार्गावर इलेक्ट्रॉनिक्स टायमिंग सिस्टीम बसवण्यात येईल. प्रत्येक धावपटूच्या स्पर्धा क्रमांकाच्या मागील बाजूस लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स चीपशी ती जोडली जाईल आणि सर्व खेळाडूंना त्यांचे वैयक्तिक टायमिंग दिले जाईल. संपूर्ण मार्गावर सायकल पायलेटिंग व्यवस्था असेल. पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे 10 मोटर सायकल पायलट धावपटूंना मार्गदर्शक म्हणून स्पर्धेपुढे नियमानुसार असतील.
सरहद मॅरेथॉन, शौर्यथॉन संस्थेचे विजेते होणार सहभागी
कारगिल (लडाख) मध्ये झालेल्या ‘सरहद कारगिल इंटर नॅशनल मॅरेथॉन 2023’ मधील विजेते तसेच जून 2024 मध्ये द्रास येथे पार पडलेल्या ‘सरहद शौर्याथॉन 2024’ चे विजेते महिला ,पुऊष धावपटूही या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
विजेत्यांना बांबूपासून बनवलेल्या ट्रॉफीज
38 व्या पुणे आंरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील विजेत्या धावपटूंना ‘बांबू सोसायटी ऑफ इंडिया’ तर्फे बांबूपासून तयार केलेल्या ट्रॉफीज देण्यात येतील, ज्या टिकाऊ आणि पर्यावरणीय जबाबदारीचे प्रतीक असेल आणि हेच या वषीचे ध्येय वाक्मय आहे. पुणे महानगर पालिकेतर्फे विजेत्यांना दरवषी प्रमाणे रोख पारितोषिके देण्यात येतील.
मॅरेथॉनला ‘फ्लॅग शिप’ चा मान
यावषी या स्पर्धेचे 38 वे वर्ष आहे. कोरोनासारखे एक दोन अपवाद वगळता सन 1983 पासून ही स्पर्धा सातत्याने दरवषी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन (एम्स)समितीने त्यांच्या वार्षिक पॅलेंडर मध्ये आपल्या मॅरेथॉनचा कायमस्वऊपी समावेश केला असून, भारतातील सर्वात जुनी मॅरेथॉन असा ‘फ्लॅग शिप’चा मान हिला मिळाला आहे.