यंदाचा मान्सून सरासरीत; आगमनास विलंब होण्याची शक्यता
स्कायमेटचा दीर्घकालीन अंदाज जाहीर
पुणे / प्रतिनिधी
यंदाचा जून ते सप्टेंबरदरम्यानचा मान्सून सरासरीत राहण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी वर्तविला आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळत असलेल्या देशवासियांना दिलासा मिळाला आहे. देशात सरासरी 102 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, 868.6 मिमी इतक्मया पावसाची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये 5 टक्के कमी-अधिकतेची शक्मयता आहे.
याबाबत बोलताना स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग म्हणाले, प्रशांत महासागरातील एल निनोचे आता ला निनोमध्ये ऊपांतर होत आहे. ला निनोदरम्यान मान्सून चांगला राहिल्याचा इतिहास आहे. तसेच सुपर एल निनोनंतर ला निनो आल्यास मान्सून दमदार राहिला आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात एल निनोचा प्रभाव राहणार आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात पाऊस जोरदार राहणार आहे. हिंदी महासागरातील इंडियन ओशन डाय पोलही सकारात्मक राहणार असून, त्यामुळेही मोसमी पावसाची स्थिती चांगली राहण्यास मदत होणार आहे.
मान्सूनला उशीर होणार
एल निनोचे ला निनोमध्ये ऊपांतर होत असल्याने यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्मयता आहे. याशिवाय कमी कालावधीत जास्त पाऊस, पावसाचे असमान वितरण होण्याचाही अंदाज आहे. देशाचा दक्षिण, पश्चिम, उत्तर पश्चिम भागात चांगला पाऊस राहील. महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील पाऊस क्षेत्रात सरासरी इतका पाऊस राहील, तर बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस कमी राहण्याची शक्मयता आहे. पूर्वोत्तर भारतात जून व जुलैमध्ये पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे.
पावसाचे नियोजन आवश्यक
दरम्यान, यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने दुष्काळाने होरपळणाऱ्या देशाला दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे मान्सून लांबण्याची शक्यता असल्याने पाण्याचे नियोजन कसे करायचे, हा प्रश्न आहे. देशातील महत्त्वाच्या जलाशयांमध्ये सध्या 35 ते 40 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे. महाराष्ट्रातील पाणीसाठाही 35 टक्क्यांपर्यंत खालावला आहे. अनेक भागांत तर दोन ते तीन महिने पुरेल इतकाच जलसाठा असल्याचे दिसते. हे पाहता पाऊस लांबल्यास पाण्याचे नियोजन कसे करणार, याचे उत्तर शोधावे लागेल.